कॅनडात मंदिरांचा विध्वंस, ट्रुडो सरकार निष्क्रिय

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
टोरोंटो,
temples in Canada भारत आणि कॅनडात तणाव निर्माण झाला असताना या देशात हिंदूंना हादरवणार्‍या घटनांची मालिका सुरू झाली आहे. कॅनडातील मंदिरांचा विध्वंस केला जात असून, त्यांच्या परिसरात खलिस्तानचे समर्थन करणारी आणि भारतविरोधी पोस्टर्स लावली जात आहेत. या घटनांमुळे हिंदू समुदायात संताप निर्माण झाला असून, दोन समुदायात तणाव वाढत आहे. मंदिरांची तोडफोड सुरूच असताना कॅनडा सरकार हातावर हात देऊन बसले आहे. त्यामुळे हिंदू समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले, असे ग‘ेटर टोरोंटो परिसरातील मंदिरांच्या विश्वस्तांनी सांगितले. प्रत्येक जण धमक्या, घोषणाबाजी आणि नंग्या तलवारी नाचवल्याबद्दल बोलत आहेत, पण त्यावर अंकुश ठेवण्यासाठी कॅनडा सरकार काहीच करीत नाही, असे विश्वस्ताने सांगितले.
 

sde354356 
 
वाढत्या तणावावर उपाययोजना म्हणून काही मंदिरांनी सुरक्षा वाढवली आहे. मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. सनातन मंदिराच्या बाहेर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या भोवती पोलादी खांब उभारण्यात आल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. temples in Canada सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे नुकसान करण्यासाठी वाहनानी धडक दिली जाऊ शकते. त्यामुळे पोलादी खांब तसेच नवीन द्वार उभारण्यात आले. मागील काही महिन्यांपासून त्रास वाढला असल्याचे मंदिराचे विश्वस्त चिमणभाई यांनी सांगितले. हॅमिल्टन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची मार्चमध्ये विटंबना झाल्याच्या प्रकारानंतर ही उपाययोजना करण्यात आली आहे. सनातन मंदिराला एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. त्यावरही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मंदिराचे मोठे दार बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.