इस्लामाबाद,
अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत Donald Bloom डोनाल्ड ब्लोम यांच्या व्याप्त काश्मिरातील दौर्यावरून वादळ निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात ते अतिशय गुपचूपपणे पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट बाल्टिस्तानमध्ये गेले होते. मात्र आता या प्रकरणावरून सर्वत्र गदारोळ झाल्यानंतर अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी प्रतिकि‘या दिली आहे. आमच्या शिष्टमंडळाने जी-20 बैठकीदरम्यान काश्मीरलाही भेट दिली होती. मात्र, डोनाल्ड ब्लोम यांचा पाकव्याप्त काश्मीरचा दौरा पूर्णपणे वेगळा होता. हा दोन देशांमधील प्रश्न आहे, जो द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवला गेला पाहिजे, असे राजदूत एरिक गार्सेटी यांनी सांगितले.
इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक‘मात माध्यमांशी बोलत असताना राजदूत गार्सेट्टी यांना अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत Donald Bloom डोनाल्ड ब्लोम यांच्या गिलगिट बाल्टिस्तानच्या गुप्त दौर्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना गार्सेटी म्हणाले की, या विषयावर सध्या येथे चर्चा करणे योग्य होणार नाही. अमेरिकेचे राजदूत यापूर्वीही तेथे गेले आहेत. जी-20 बैठकीदरम्यान आमचे शिष्टमंडळ काश्मीरलाही गेले होते, याकडे गार्सेटी यांनी लक्ष वेधले. काश्मीरबाबत अमेरिकेच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा आहे आणि तो द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवला गेला पाहिजे व अमेरिकेसह कोणत्याही तिसर्या पक्षाने त्यात हस्तक्षेप करू नये.
पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत Donald Bloom ब्लॉम यांच्या गिलगिट-बाल्टिस्तान भेटीशी संबंधित प्रश्नावर गार्सेटी यांनी हे वक्तव्य केले आहे. डोनाल्ड ब्लोम यांनी गेल्या आठवड्यात गिलगिट बाल्टिस्तानला भेट दिली होती. भारत व्याप्त काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग मानतो. डॉनच्या वृत्तानुसार, ब्लोम यांची ही भेट सरकार आणि दूतावास या दोघांनीही गुप्त ठेवली होती आणि त्याबद्दल मीडियाला कोणतीही माहिती दिली नव्हती.