मुंबई,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 ते 8 ऑक्टोबरदरम्यानचा ब्रिटन आणि जर्मनीचा दौरा पुढे ढकलला आहे, अशी माहिती Eknath Shinde's visit to Britain, Germany मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकार्याने मंगळवारी दिली. दौर्याच्या नवीन तारखा ठरवण्याबाबत काम सुरू आहे. दौरा पुढे ढकलण्यामागील कारण देण्यात आले नाही. महाराष्ट्र आणि जर्मनीतील शहरांमध्ये सामंजस्य करार करण्यासाठी तसेच गुंतवणूक परिषदेसाठी एकनाथ शिंदे उद्योगांच्या आणि इतर गुंतवणूक विभागांच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार होते.
या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख परत आणण्यासाठी ते एक सामंजस्य करारही करणार होते. त्यांच्या दौर्याच्या तपशीलांवर काम केले जात असल्याची माहिती Eknath Shinde's visit to Britain, Germany मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी एक आठवड्याच्या विदेश दौर्याची योजना आखली आहे. गुंतवणूक आणणारी, आपल्या देशाला किंवा राज्याला ओळख मिळवून देणार्या दौर्यावर आक्षेप नाही. त्यांचा दौरा दाव्होसच्या दौर्याप्रमाणे नसावा.28 दिवसांच्या सुट्यांसाठी या दौर्यासाठी सरकारने जवळपास 40 कोटी रुपये खर्च केले होते, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केली होती.