नवी दिल्ली,
Indian hockey team आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या मोहिमेचा आज तिसरा दिवस आहे. आज हॉकीमध्ये भारताने सिंगापूरचा 16-1 असा पराभव केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानविरुद्ध 16-0 ने शानदार विजय नोंदवल्यानंतर, भारताने सिंगापूरविरुद्ध 16 गोल केले, तर विरोधी संघ केवळ एक गोल करू शकला.
आता Indian hockey team गुरुवारी भारताचा सामना आशियाई क्रीडा स्पर्धेतील गतविजेत्या जपानशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय हॉकी संघाने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. जपानविरुद्ध आपला दबदबा कायम ठेवण्यात भारत यशस्वी होणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.