तातडीच्या सुनावणीस हायकोर्टाचा नकार

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
अहमदाबाद, 
 
Gujarat High Court गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि संजयसिंह यांना पंतप्रधानांच्या शैक्षणिक पदवीवरून केलेल्या टिप्पणीवरून दाखल करण्यात आलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील समन्स रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. अरविंद केजरीवाल आणि आपचे राज्यसभा सदस्य संजयसिंह यांनी गुजरात विद्यापीठाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात सत्र न्यायालयाच्या समन्सविरुद्ध त्यांचे पुनरीक्षण अर्ज फेटाळण्याच्या 14 सप्टेंबरच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले आहे.
 
 
Gujarat High Court
 
Gujarat High Court : केजरीवाल यांचे वकील पर्सी कविना यांनी तातडीच्या आधारावर सुनावणी घेण्याची विनंती केली असता, न्यायमूर्ती समीर दवे यांनी मंगळवारी हायकोर्टात सूचीबद्ध प्रकरणावर प्राधान्याने सुनावणी देण्यास नकार दिला. आता हे प्रकरण 29 सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा हायकोर्टाने आप नेत्यांच्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एम. ब्रह्मभट्ट यांनी यापूर्वीच्या एका आदेशात दोन्ही नेत्यांना समन्स देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता आणि तो आदेश बेकायदेशीर किंवा चुकीचा नाही असे म्हटले होते.