उत्तरप्रदेशात आयएसआय एजंटला अटक

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
- पाकिस्तानला दिली महत्त्वाची माहिती
 
लखनौ, 
उत्तरप्रदेशातील दहशतवाद विरोधी पथक अर्थात् एटीएसने येथून शैलेंद्रकुमार नावाच्या ISI agent arrested आयएसआय एजंटला अटक केली. शैलेंद्रने अरुणाचल प्रदेशात लष्करात अस्थायी कामगार म्हणून काम केले आहे. तो कासगंज येथील रहिवासी असून, पाकिस्तानला महत्त्वाची माहिती दिल्याचे चौकशीत समोर आले आहे.
 

ISI agent arrested 
 
ISI agent arrested आयएसआयचा हॅण्डलर त्याच्यासोबत हरललिनकौर नावाच्या बनावट फेसबुक खात्याच्या माध्यमातून संपर्कात होता. हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने शैलेशकुमार आयएसआयसाठी हेरगिरी करू लागला, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. हरलिनकौरसोबतच तो प्रीती नावाच्या मुलीसोबतही व्हॉट्स अ‍ॅप कॉलवर बोलायचा. मी आयएसआयसाठी काम करते, तू देखील कर. मदत करशील, तर चांगली रक्कम मिळेल, असे आमिष प्रीतीने त्याला दाखवले. लष्कराशी संबंधित माहिती प्रीतीनेच त्याच्याकडून मागितली होती. लष्कराच्या हालचालींची छायाचित्रे तो हरलिनकौरच्या फेसबुक खात्यावरील मेसेजच्या माध्यमातून पाठवायचा. त्या मोबदल्यात शैलेंद्रला एप्रिल महिन्यात दोन हजार रुपये मिळाले होते.
 
 
 
प्रीतीसोबत बोलताना दिलेल्या माहितीसाठी त्याला कित्येकदा पैसे मिळाले. हरलिनकौर आणि प्रीती ISI agent arrested आयआसआयचे हँडलर होते, ते पाकिस्तानातून भारतीय लष्कराची माहिती गोळा करीत होते. शैलेंद्रकुमारने अरुणाचल प्रदेशात लष्करामध्ये सात ते आठ महिने हमाल म्हणून काम केले आहे. अरुणाचल प्रदेशातील लष्कराच्या ठिकाणांची त्याला चांगली माहिती होती. त्याने लष्करी वाहनांच्या हालचालींची तसेच ठिकाणांबाबतची छायाचित्रे पाकिस्तानला पाठवली होती.