लोकसभा निवडणुकीनंतर मान सरकार पडणार?

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
चंदीगड,
Lok Sabha elections पुढील लोकसभा निवडणुकीनंतर भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडेल, असा दावा पंजाबमधील काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रताप सिंह बाजवा यांनी केला आहे. सध्याच्या सरकारमधील किमान 32 लोक त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पंजाबमधील जनतेला संसदीय निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे, कारण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विद्यमान सरकार दोन महिनेही टिकू शकणार नाही.
 
 
SD34543523
 
प्रताजसिंग बाजवा म्हणाले की, पंजाब पूर्णपणे कर्जात बुडाला आहे. येत्या 7 ते 8 महिन्यांत संसदीय निवडणुका होणार आहेत, मी पंजाबमधील सर्व घटकांना आवाहन करतो की अजून वेळ आहे. काँग्रेस लोकसभेच्या सर्व 13 जागा लढवणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने सर्व 13 जागा जिंकल्या पाहिजेत. Lok Sabha elections त्यानंतर राज्य सरकार दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, अशी ग्वाही मी देतो. बाजवा यांनी दावा केला की सध्याच्या सरकारमधील किमान 32 लोक त्यांच्या संपर्कात आहेत.