सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सहकार्य

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
- मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

मुंबई, 
महाराष्ट्राच्या Maritime Security Coast Guard सागरी प्रदेशातील सुरक्षा योजनांसाठी राज्य सरकारकडून तटरक्षक दलाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
 
 
sea-cm
 
या भेटीत बाडकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना राज्याच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांबाबत माहिती दिली आणि Maritime Security Coast Guard तटरक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तत्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळीसह राज्यातील सागरी परिक्षेत्रात तटरक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारण्याकरिता राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.