नागपूर,
Nagpur flood : शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नागपूरच्या विविध भागात राहणार्या विशेषतः नाग नदीच्या काठावरील सर्व वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या भागातील घऱांमध्ये देखील पाणी शिरले. घरातील साहित्य भिजले व त्यासोबत शाळकरी विद्यार्थ्यांचे वहया ,पुस्तके व युनिफॉर्म खराब झाले. या विद्यार्थ्यांना मदत म्हणून सामाजिक भान बाळगत या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दि. ब्लाईंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी सरसावले.
त्यांनी प्रत्येक एक वही आणावी असे अपेक्षित असताना, अधिक वह्या सोबतच या विद्यार्थ्यांनी अनेक वह्या ,पुस्तके ,स्टेशनरी साहित्य, कंपॉस बॉक्स आणले आणि आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले. या Nagpur flood साहित्याची खरोखर आवश्यकता होती. परिस्थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे केलेला हात प्रशंसनीय आहे. विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनी व कर्मचार्यांनी कोर्या साड्या, कुर्ते, बेडशीट्स व इतर साहित्य गोळा करुन या गरजूंना मदतीचा हात दिला. या उपक‘मामुळे संकटकाळात मदत करणे ही सहकार्याची भावना मुलांमध्ये अधिक दृढ झाली. संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुलांनी केलेल्या मदतीसाठी संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे ,मु‘याध्यापक डॉ. रूपाली हिंगवे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक मेघा पाध्ये, पर्यवेक्षिका शिल्पा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
बाराशे वह्यांचा गठ्ठा
या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. Nagpur flood एक वही आणायला सांगितली असताना वह्या, पुस्तके, कंपॉस बॉक्स आदी साहित्य आणल्याने जवळपास स्टेशनरी साहित्य गोळा झाले आहे. या उपक‘मात आता 1200 वह्या एकत्र झाल्या आहेत. आता या वह्यांचे गठ्ठे तयार झाले. आता बचतगटाकडून पिशव्या उपलब्ध झाल्या. आता त्याची किट तयार करण्यात आली आहे. त्यात वह्या, दोन पेन, एक पेन्सिल असून या सर्व किट्सचे वितरण आता विविध वस्त्यांमधील मुलांना करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे यांनी दिली.