बायडेन यांच्यामुळे अमेरिका चीनच्या पराधीन

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
- निक्की हेली यांचा आरोप
 
वॉशिंग्टन, 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेला कम्युनिस्ट चीनवर अधिक अवलंबून ठेवले आहे, असा आरोप रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार Nikki Haley निक्की हेली यांनी केला. मी अमेरिकेविरुद्ध ऊर्जेचा वापर करणार्‍या प्रत्येक शत्रू देशाविरुद्ध उभी राहील, असे वचन त्यांनी दिले. ओक्लाहोमा शहरातील हॅम इन्स्टिट्यूट फॉर अमेरिकन एनर्जीने आयोजित केलेल्या अमेरिकन ऊर्जा संरक्षण परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बायडेन यांनी अमेरिकेला कम्युनिस्ट चीनवर अधिक अवलंबून ठेवले आहे. गंभीर पुरवठ्यासाठी आपण कधीही शत्रूवर अवलंबून राहू नये, हे कोरोना साथीच्या रोगाने सिद्ध केले आहे, असे हेली यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 
 
Nikki Haley
 
आम्हाला हवे असलेले सर्वांत प्रगत तंत्रज्ञान बनविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने आमच्याकडे आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आम्हाला स्वतःला गरीब करण्याची गरज नाही. आपला देश स्वच्छ, निरोगी आणि आनंदी बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिकाधिक अमेरिकन ऊर्जेचा वापर करायला हवा, असे त्या Nikki Haley म्हणाल्या. चीन हा एकमेव देश नाही, ज्याला मी जबाबदार धरीन. मी आपल्या विरोधात ऊर्जा वापरणार्‍या प्रत्येक शत्रूच्या विरोधात उभे राहील.
 
 
 
रशिया, इराण आणि व्हेनेझुएला त्यांच्या वाईट गोष्टींना पुढे नेण्यासाठी त्यांचे तेल वापरत आहेत आणि ज्यो बायडेन त्यांना ते मिळवून देत आहेत. ते आधी बंद करा, मी तर असे करू देणार नाही. अमेरिकनांपेक्षा कोणीही अधिक सर्जनशील किंवा कल्पक नाही, हे इतिहासाने सिद्ध केले आहे. जेव्हा आपल्याला स्वप्न पाहण्याचे व धाडस करण्याचे स्वातंत्र्य असते, तेव्हा आपण अविश्वसनीय मार्गांनी जीवन बदलतो. जग आज अधिक स्वच्छ, श्रीमंत आणि सुरक्षित आहे. कारण अमेरिकन सर्वोत्तम काम करतो, असे त्या म्हणाल्या. कम्युनिस्ट चीन हा अस्तित्वासाठी धोका आहे. चीनने अमेरिकेच्या नोकर्‍या नष्ट केल्या आहेत व एक प्रचंड सैन्य तयार करण्यासाठी अमेरिकन रहस्ये चोरली आहेत, असा आरोप त्यांनी केला.