कॅनडा अतिरेक्यांचे सुरक्षित आश्रयस्थळ

26 Sep 2023 18:14:48
- श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काढले वाभाडे
- भारतावरील आरोपाने संतप्त
 
न्यू यॉर्क, 
खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांवर श्रीलंकाही भडकला आहे. कॅनडा हे Safe haven for terrorists अतिरेक्यांचे सुरक्षित आश्रयस्थळ आहे, असे वाभाडे श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी काढले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारत आणि कॅनडातील राजनयिक तणावावर श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अली साबरी सोमवारी बोलत होेते. उत्तर अमेरिकेतील या देशाकडून अतिरेक्यांना सुरक्षित आश्रय उपलब्ध करण्यात आला आहे. या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी चिथावणीखोर आरोप करण्याचा मार्ग अवलंबला, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री अली साबरी म्हणाले.
 
 
todo
 
Safe haven for terrorists : कोणताही पुरावा नसताना कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचे आश्चर्य वाटले नाही. यापूर्वी त्यांनी श्रीलंकेच्या बाबतीतही असेच केले होते. श्रीलंकेत नरसंहार झाल्याची आवई त्यांनी उठवली होती. श्रीलंकेत नरसंहार झाला नसल्याचे सर्वांना माहीत आहे, असे अली साबरी यांनी म्हटले. कोणत्याही स्वायत्त देशाच्या प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, असे अली साबरी यांनी जस्टिन ट्रुडो यांना स्पष्टपणे संदेश देताना सांगितले. दुसर्‍या देशांच्या प्रकरणात कुणीही लुडबूड करू नये तसेच आमचा देश कसा चालवावा, याचा सल्ला कुणी देऊ नये, असे अली साबरी यांनी कॅनडावर घणाघात करताना सांगितले.
 
 
हिंद महासागरातील देशांनी एकत्र यावे
इतरांप्रमाणेच आपणही आपल्या देशावर प्रेम करतो, असे अली साबरी यांनी हिंद महासागरातील देशांना एकत्र येण्याचे आवाहन करताना सांगितले. आमच्यासाठी हिंद महासागराची ओळख पुरेशी आहे. आपल्या क्षेत्राची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. आपल्याला सोबत काम करण्याची गरज आहे. याच प्रकारे आपण शांतिपूर्ण वातावरण कायम ठेवू शकतो. दुसर्‍याच्या बोलण्यावरून आपल्या प्रकरणांकडे पाहू नये, असे अली साबरी यांनी म्हटले.
Powered By Sangraha 9.0