तोतया पोलिसासह स्वयंघोषित पत्रकार अटकेत

औषधी दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
दर्यापूर, 
fake police : पोलिस असल्याची बतावणी करून आयुर्वेदिक औषधाचा व्यवसाय करणार्‍या दुकानदाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या 4 जणांना दर्यापूर पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. राज बाबाराव सोळंकी रा. कोढाळी यांचे दर्यापूर येथील डायमंड व्यापारी संकुलात आयुर्वेदिक औषधी विक्रीचे दुकान आहे. प्रकरणातील चार आरोपी सायंकाळी 5 वाजेदरम्यान दुकानात आले. आम्ही पोलिस असून तुम्ही नकली औषधी विकत असल्याची आमच्याकडे तक्रार आहे, असे सागून सोळंकी यांना पैशाची मागणी केली.
 
fake police
 
या fake police प्रकाराने सदर दुकानदार घाबरून गेला. यावेळी नकली पोलिसांनी दुकानदारास मारहाण सुद्धा केली व पैसे मागितले, मात्र काही वेळाने त्याला शंका आल्याने त्यांनी आजुबाजुच्या दुकानदारांना बोलावून घेतले. सदर व्यक्ती बनावट असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दर्यापूर पोलिसांना याविषयी माहिती दिल्यावर पोलिसांनी नितीन राजू तायडे रा. सहयोग कॉलनी अमरावती, गजानन सोनकुसरे रा. एमआयडीसी, अमरावती, रूपेश मस्के रा. हमालपुरा अमरावती व स्वयंघोषित पत्रकार सादिक शहा महबूब शहा यांना ताब्यात घेतले असून वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.