- शरद पवार यांची माहिती
मुंबई,
घमंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला अनिच्छेने पाठिंबा दिला, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात केला असतानाच, दुसर्या दिवशी ‘इंडिया’ आघाडीतील ज्येष्ठ नेते Sharad Pawar शरद पवार यांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला मनापासून पाठिंबा दिला होता. पंतप्रधान मोदी यांना त्याबद्दल योग्य माहिती दिली गेली नाही.
महाराष्ट्र आणि केंद्रातील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनीच महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलली होती, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला संबोधित करताना पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी महिला आरक्षण विधेयकाला अनिच्छेने पाठिंबा दिल्याबद्दल बोलले. हे खरे नाही. आपण सर्वांनी या विधेयकाला मनापासून पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, 24 जून 1994 रोजी महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने महिला धोरण आणले होते. ते देशातील पहिले होते तसेच केंद्रातील काँग्रेस सरकारने 73 वी घटनादुरुस्ती आणली होती, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. मी संरक्षण मंत्री असताना लष्कर, नौदल आणि हवाई दलात महिलांना 11 टक्के आरक्षण देण्यात आले होते.
अहमदाबाद येथे उद्योगपती गौतम अदानी यांच्या भेटीबाबत विचारले असता Sharad Pawar शरद पवार म्हणाले की, ते बारामतीतील एका व्यावसायिकाच्या औद्योगिक युनिटचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. साणंद औद्योगिक वसाहतीत झालेल्या कार्यक‘माला अदानी हे प्रमुख पाहुणे होते. भारत-कॅनडा तणावाच्या मुद्यावर पवार म्हणाले की, भारतीय नागरिक म्हणून आपला संपूर्ण पाठिंबा भारत सरकारच्या धोरणाला असेल.