नऊ अतिरेक्यांना बारामुल्लात अटक

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
- सीमापार शस्त्रास्त्र तस्करीत सहभाग
 
श्रीनगर, 
सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दोन मॉड्युल उद्ध्वस्त करीत सीमापार शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्याच्या तस्करीत गुंतलेल्या नऊ Terrorists arrested अतिरेक्यांना वेगवेगळ्या कारवाईत अटक केली आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. पाकिस्तानी सूत्रधारांच्या इशार्‍यावर हे अतिरेकी शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्याच्या सीमापार तस्करीत गुंतले होते तसेच तस्करी करून आणलेली शस्त्रास्त्रे ते दहशतवादी कारवायांसाठी लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना उपलब्ध करायचे.
 
 
terrorists arrested
 
Terrorists arrested : बारामुल्लातील जानबाझपोरा परिसरात राहणारा यासीन अहमद शाह नावाचा तरुण बेपत्ता असून, तो टीआरएफ संघटनेत सहभागी झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून 21 सप्टेंबरला प्राप्त झाली, असे बारामुल्लाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमोद नागपुरे यांनी सांगितले. गुुप्तचर माहितीच्या आधारे टप्पर पट्टन येथे फिरता वाहन तपासणी नाका उभारण्यात आला. वाहनांच्या तपासणीदरम्यान 22 सप्टेंबरला एका अतिरेक्याला पकडले. त्याच्या ताब्यातून आक्षेपार्ह साहित्य, पिस्तूलसह शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा, पिस्तूलचे मॅग्झिन आणि आठ काडतुसे जप्त करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे परवेझ अहमद, निगेना, आफ्रिना उर्फ आयात व इतरांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातूनही तीन ग्रेनेडसह शस्त्रसाठा जप्त केला, अशी माहिती नागपुरे यांनी दिली.