तभा वृत्तसेवा
अमरावती,
Gnanamata School : ज्ञानमाता हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींचा शाळेतील शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून हे प्रकरण चांगलेच तापले आहे. विकृत कृत्य करणार्या मर्विन जोसेफ नावाच्या त्या शिक्षकावर कठोर कारवाई करा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना मंगळवारी निवेदन देऊन केली आहे.
उघड झालेल्या गंभीर प्रकरामुळे शहरातील Gnanamata School विद्यार्थीनीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून यात दोषी असणार्या शिक्षकावर व त्याला पाठीशी घालणार्या शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 2016 मधील शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले असतानाही मोठ्या प्रमाणात शाळा प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचे आढळून आलेले आहे. सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण समितीची स्थापना करून, महिला समुपदेशकांच्या साह्याने मुलींच्या तक्रारीचे निवारण करण्यात यावे, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष महिला बाल सुरक्षा समिती नेमावी आणि शाळा समितीच्या सभांप्रमाणे बालसुरक्षा समितींची सभा किमान दोन महिन्यातून एकदा आयोजित करून आढावा घेण्यात यावा, अशी मागणी देखील अभाविपने केली आहे. निवेदन देतेवेळी अमरावती महानगर मंत्री रिया गुप्ते, महानगर संघटन मंत्री आदित्य बांते, रिद्धेश देशमुख, आर्यन ठाकरे, रिदम शहा, निकेत कलाने, श्रेयस देशमुख, आयुष पारीख यांच्यासह अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षकी पैशातूनच हद्दपार करा
ज्ञानमाता हायस्कूलमधील 13 वर्षीय विद्यार्थिनीवर दुष्कृत्य करणार्या शिक्षकाला Gnanamata School शिक्षकी पैशातूनच हद्दपार करा, अशी मागणी उपशिक्षणाधिकारी कोल्हे व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्याकडे भाजपा महिला मोर्चाने मंगळवारी केली. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी लता देशमुख, सुरेखा लुंगारे, गंगा खारकर, संगीता शिंदे यांच्यासह अनेक महिला आणि विश्व हिंदू परिषदेचे विजय शर्मा व कार्यकर्ते हजर होते. विद्यार्थ्यांवरील अत्याचार व शोषण थांबविण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. ज्यामध्ये पालक, विद्यार्थी, सामाजिक संघटना प्रतिनिधी व पोलिस विभागाच्या महिला सहभागी असतील.