आयसरच्या धडकेने एसटी चढली दुभाजकावर

26 Sep 2023 20:36:02
तभा वृत्तसेवा
कुर्‍हा, 
Kurha Accident : अमरावतीवरून कुर्‍ह्याकडे येत असलेल्या एसटी बसला तिवस्याकडून येत असलेल्या आयसर ट्रकची कुर्‍हा येथील अमरावती टी पॉईंटवर जबर धडक बसल्याने एसटी बस रस्ता दुभाजकावर जाऊन धडकली. यात जीवित हानी झाली नसली तरी एसटीचे बरेच नुकसान झाले असून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली.
 
Kurha Accident
 
आर्वी आगाराची एमएच 40 एन 8129 क्रमांकाची एसटी बस Kurha Accident  अमरावतीवरून कुर्‍ह्याकडे येत असताना तिवस्यावरून चांदूर रेल्वेकडे जाणारा के ए 52 बी 2539 क्रमांकाच्या आयसर ट्रकने एसटीला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिल्याने एसटी बस दुभाजकावर जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कुठल्याच प्रकारची जीवित हानी झाली नाही. बसमध्ये असलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. पुढील तपास कुर्‍हा पोलीस करीत आहे.
Powered By Sangraha 9.0