बब्बर खालसाचे कारस्थान !

26 Sep 2023 17:55:02
अग्रलेख
babbar khalsa-nia खलिस्तानी चळवळीतील एक प्रमुख म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येवरून भारत आणि कॅनडा या दोन देशांत निर्माण झालेला तणाव अद्याप पुरता शमलेला नाही. अशातच बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी असलेल्या खलिस्तानवादी संघटनेने, खलिस्तानवादी तत्त्वांच्या मदतीने, आपल्या महत्त्वाच्या सदस्यांना आणि मारेक-यांना त्यांच्या इच्छेनुसार विशिष्ट देशांत वसवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची बातमी आली आहे. babbar khalsa-nia त्यांना विदेशांत वसवून त्यांच्याकडून हवी ती कामगिरी करून घेतली जाणार, हे उघड आहे. आणखी एक वृत्त असे की, अर्शदीप दल्ला या खलिस्तानी दहशतवाद्याचे संबंध लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानच्या आयएसआयशी असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) स्पष्ट केले आहे. या दल्लाने साधू आणि धार्मिक संतांना ठार करण्याचे षडयंत्र रचलेले होते. babbar khalsa-nia एनआयएच्या आरोपपत्रात बब्बर खालसाचे किंवा अशा खलिस्तानवादी घटकांचे मनुसबे विस्तारपूर्वक दिलेले आहेत आणि खलिस्तानवादी किंवा भारतविरोधी घटकांकडून बब्बर खालसाला मदत मिळत असल्याचा उल्लेखही केलेला आहे. एकुणात हे सारे चिंताजनक आणि आव्हानात्मक आहे. काश्मिरातील दहशतवाद अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. babbar khalsa-nia मणिपूरच्या घटनाक्रमानंतर ईशान्य भारतात अद्याप अस्वस्थता कायम आहे.
 
 
babbar khalsa-nia
 
 
 
अशात खलिस्तानवादी तत्त्वांचे हे इरादे मुत्सद्देगिरीसोबतच आक्रमकपणे हाणून पाडण्याशिवाय भारताला आता पर्याय राहिलेला नाही. babbar khalsa-nia बब्बर खालसाला भारतात म्हणजे पंजाबात खलिस्तान नावाचे शिखांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे आहे. त्यासाठी ही संघटना हत्या, बॉम्बस्फोट असे सारे काही घडवून आणत असते. इस्लामी दहशतवाद्यांकडून भारतात कुठेही, केव्हाही बॉम्बस्फोट घडवून आणले जायचे तो काळ फार जुना नाही. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कणखर सरकार आल्यामुळे इस्लामी दहशतवाद्यांना चांगलीच जरब बसली आहे. babbar khalsa-nia मात्र, त्यांच्या कारवाया पूर्णत: संपलेल्या नाहीत. आता त्यांची मदत प्रामुख्याने पाकिस्तानमार्गे खलिस्तानवाद्यांना मिळू लागली आहे. या सर्वांना मिळून भारतात आतंक, अस्थिरता निर्माण करायची आहे. त्यासाठी छोट्या-मोठ्या गँगस्टर्स, गुंडांना हाताशी धरायचे आणि त्यांना सीमेपलीकडून अद्ययावत शस्त्रे पुरवायची, असा हा डाव असल्याचा खुलासा एनआयएने केलेला आहे. babbar khalsa-nia बब्बर खालसावर बंदी आहे. तरीही अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, स्वीत्झर्लंड आणि पाकिस्तानात त्यांच्या कारवाया सुरू आहेत. विशेष म्हणजे त्याला इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा पाठींबा मिळत आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानातून बब्बर खालसाची सूत्रे हलविली जातात. babbar khalsa-nia वाधवा सिंग बब्बर हा त्यांचा नेता पाकिस्तानातच लपून बसलेला आहे.
 
 
एका अर्थाने खलिस्तानच्या नावाखाली माथेफिरू झालेल्यांना भारताच्या उत्कर्षाला विरोध असलेल्या एका शेजारी इस्लामी देशाकडून भारताविरुद्ध भडकावण्याचे आणि घातपात घडवून आणण्याचे हे महाभयंकर कारस्थान आहे. babbar khalsa-nia या कारस्थानाचे ध्येय खलिस्तानची निर्मिती हे सांगितले जात असले, तरी तो अजेंडा कधीचाच मागे पडलेला आहे आणि त्याच्या नावावर भारतात अस्थिरता माजवणे, आतंक निर्माण करणे, विकासाच्या प्रक्रियेत खीळ घालणे असे प्रयत्न सुरू आहेत. भारताला दहशतवादविरोधी लढाईचे नावीन्य नाही. स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत पाकिस्तानने दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला त्रास देणे सुरू ठेवले आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीर, लेह-लडाख या भागांतील सीमांचा वापर केला जातो. babbar khalsa-nia ईशान्येत अस्थिरता माजवण्यासाठी म्यानमार, बांगलादेश, चीन, नेपाळशी लागून असलेल्या सीमांचा वापर होत असतो. ओडिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांमध्ये नक्षलवादाचा त्रास आहे. babbar khalsa-nia अर्थात सुरक्षेचे आव्हान दुहेरी आहे. एकीकडे सीमांचे रक्षण करायचे आणि दुसरीकडे देशांतर्गत विभाजनवादी तत्त्वांशीही लढायचे असा हा संघर्ष. हा संघर्ष भारताने आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि अंतर्गत सुरक्षेचे कठोर उपाय या माध्यमांतून हाताळला आहे.
 
 
पाकिस्तानच्या भूमीतून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी त्या देशावर दबाव आणण्यासाठी भारताने सातत्याने आंतरराष्ट्रीय समर्थनाची मागणी केली आहे. babbar khalsa-nia कित्येकदा पाकिस्तानला उघडे आणि एकाकी पाडण्यात उत्कृष्ट मुत्सद्देगिरी आणि सामरिक रणनीतीची भूमिका भारताने घेतली. उरी दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही कुठवरही जाऊ शकतो, हे भारताने त्यातून दाखवून दिले. बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या मनसुब्यांचे आव्हान सीमा आणि सीमेच्या आत असे दोन्ही पातळ्यांवर आहे. babbar khalsa-nia हे आव्हान बहुआयामी आहे. त्यामुळे पंजाबसह भारतात खलिस्तानच्या मागणीच्या निरर्थकतेच्या संदर्भात जागृती करणे, पंजाबमध्ये काम करीत असलेल्या खलिस्तानवादी तत्त्वांच्या मुसक्या बांधणे, सीमावर्ती भागात बंदोबस्त तगडा करणे, विशेषत: पाकिस्तान-चीन या दोन्ही देशांच्या सीमेवरून भारतात शिरू पाहणा-या विघातक तत्त्वांचा बीमोड करणे आणि हे सारे करीत असताना जगभरात इस्लामी दहशतवादी नेटवर्कचे खलिस्तानी साटेलोटे उघड पाडून ते नेस्तनाबूत करणे इतके प्राथमिक पदर या आव्हानाला आहेत. babbar khalsa-nia 
 
 
याचा तपशील एनआयएसारख्या यंत्रणेने आखला असेलच. तथापि, केवळ सरकारला नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला सतर्क राहणे आवश्यक आहे. आपल्या सुरक्षिततेला कोणत्याही नवीन प्रकारचा, अकल्पित धोका निर्माण होऊ शकतो. भारत हा जगातील एक बलाढ्य देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. babbar khalsa-nia त्याचे अर्थकारण वेगाने प्रगती करीत आहे. चंद्रावर आणि सूर्यावर या देशाने झेंडा रोवलेला आहे. ही प्रगती शेजाऱ्यांना आणि शत्रू राष्ट्रांना पाहावत नाही. त्यामुळे खलिस्तानसारखे कालबाह्य मुद्दे समोर करून तरुणांची माथी भडकावण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यासाठी बेकारांची फौजदेखील वापरली जाते. जेवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थकारण आणि पायाभूत सुविधा विकसित होतील, तेवढ्या प्रमाणात अशा विघातक तत्त्वांना मिळणारे मदतीचे हात कमी होतील. babbar khalsa-nia आपले अंतर्गत आणि बाह्य शत्रू मोजके आहेत. पण, त्यांना आपल्याकडे असलेल्या सामाजिक अस्वस्थतेतून, विषमतेतून, बेकारीतून, नैराश्यातून सकस जमीन गवसते आणि ते प्रतिसादाचे, पाठबळाचे चांगले पीक घेतात. ते भारताच्या मुळावर उठलेले आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मात्र, आक्रमक व धोरणी भूमिकादेखील आवश्यक आहे.
 
 
पंजाबात धाडसत्र सुरू झाले आहे. दहशतवादी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांची संपत्ती जप्त करण्याचे काम पोलिस व प्रशासनाने सुरू केलेले आहे. babbar khalsa-nia अनेकांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिसा जारी झालेल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा असे म्हणत आहेत की, कोरोनाच्या काळात दहशतवाद्यांनी आणि गँगस्टर्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंजाबातल्या तरुणांना खोटी स्वप्ने दाखवून जवळ केले. त्यांची सहानुभूती मिळविली. अनेकांच्या खात्यात ही सहानुभूती qकवा छोट्या-मोठ्या मदतीच्या मोबदल्यात विदेशातून पैसादेखील आला. अशाच युवकांना हाताशी धरून विदेशात बसलेले भारतविरोधक पंजाबात आणि एकूणच भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. babbar khalsa-nia बब्बर खालसाचे मनसुबे उघड झाले हे चांगलेच झाले. आता त्यांचे खरे रूप लोकांना कळेल. बब्बर खालसासारख्या इतरही संघटना व व्यक्ती आहेत, ज्यांना भारताबद्दल द्वेष आहे. त्या साऱ्यांना वठणीवर आणायचे तर आपल्याला आक्रमकच व्हावे लागेल आणि नागरिकांना या आक्रमकतेला पाठबळ द्यावे लागेल.
Powered By Sangraha 9.0