मुंबई,
mantralay मंगळवारी मुंबईतील चर्चगेट परिसरात एका व्यक्तीने मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याचा जीव वाचला आहे. कारण इमारतीच्या प्रांगणात बसवलेल्या सुरक्षा जाळ्यातून तो पडला. सध्या पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, ज्याने इमारतीवरून उडी मारली तो मुंबईबाहेरचा आहे का? याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. तो मंत्रालय कोणत्या उद्देशाने आले होते, याचीही माहिती काढण्यात येत आहे.