नफेखोरीमुळे शेअर बाजारांत घसरण

26 Sep 2023 20:56:17
मुंबई :
आयटी आणि बँकिंग क्षेत्रात झालेली नफेखोरी, आशियाई बाजार कमकुवत झाल्याचे संकेत आणि मोठ्या प्रमाणात विदेशी निधीचा वळत्या ओघाच्या परिणामामुळे मंगळवारी शेअर बाजारांत घसरण झाली. मुंबई stock market शेअर बाजाराचा निर्देशांक 78 अंकांनी घसरून 65,945 अंकांवर बंद झाला.
 
 
stock market
 
दिवसभराच्या सत्रादरम्यान निर्देशांकात 158 अंकांची घसरण झाली होती. राष्ट्रीय stock market शेअर बाजाराचा निफ्टी केवळ 9 अंकांनी घसरून 19,664 या पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात टेक महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, टायटन, इंड्सइंड बँक आणि बजाज फिनसर्व्हमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.
Powered By Sangraha 9.0