कृत्रिम तलावांत बाप्पांचे विसर्जन

27 Sep 2023 20:00:40
तभा वृत्तसेवा
यवतमाळ
artificial ponds सार्वजनिक तसेच घरगुती गणरायाचे आगमन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले आहे. मागील नऊ दिवसांपासून गणपती घरोघरी विराजमान आहे. आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली असून अनंत चतुर्दशी गुरुवार, 28 सप्टेंबरपासून बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे.
 
 
कुंद
 
या अनुषंगाने यवतमाळ नगर परिषद प्रशासन सज्ज झाले असून शहरात 29 कृत्रिम तलावांसह 12 पारंपरिक सार्वजनिक टाके व विहिरी सज्ज करण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नैसर्गिक जलस्रोतांमधील वाढते प्रदूषण लक्षात घेता नैसर्गिक संवर्धनासाठी नपकडून विसर्जनासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.artificial ponds शहरात गणपती विसर्जनासाठी विविध भागांत 29 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या कृत्रिम विसर्जन तलावाजवळ प्रत्येक प्रभागात दोन ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून पीओपीच्या मूर्ती वेगळ्या करण्यात येतील. यासाठी प्रत्येक कुंडावर दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या विहिरींमध्ये होणार विसर्जन
लकडगंज, गवळीपुरा, बालाजी चौक, शनी मंदिर चौक, स्वावलंबी शाळा, विठ्ठल रूक्मिणी मंदिर वडगाव, महिला विद्यालय टाके, अमराईपुरा टाके, पिंपळगाव पुलाजवळ, बालाजी मंगल कार्यालय, रायभोरनगर वाघापूर, पिंपळगाव, कॉटन मार्केट चौक गणपती मंदिर येथील विहिरीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0