अ‍ॅड. प्रसन्न मालेकर यांचे देवी महात्म्यावर निरुपण

    दिनांक :29-Sep-2023
Total Views |
यवतमाळ :
बापू सहस्रबुद्धे स्मृतिप्रीत्यर्थ नवरात्रातील अष्टमीवर आधारित ‘आदिशक्तीची अष्टमी’ या ग्रंथाचे प्रकाशन रविवार, 1 ऑक्टोबरला होत आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता समर्थ इवेन्ट, कशाळकर हॉल, श्रोत्री हॉस्पिटलसमोर, येथे होत आहे. पुस्तकाचे लेखन चैतन्य सहस्रबुद्धे यांनी केले असून प्रकाशनास कोल्हापूर येथील Adv. Prasanna Malekar अ‍ॅड. प्रसन्न मालेकर उपस्थित राहणार आहेत.
 
 
Ashtami book
 
Adv. Prasanna Malekar अ‍ॅड. मालेकर हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे संशोधक, निवेदक, मूर्ती अभ्यासक म्हणून मागील 15 वर्षांपासून कार्य करीत आहेत. त्यांची देवी महात्म्यावर शेकडो व्याख्याने झाली आहेत. प्रकाशनानंतर श्री महालक्ष्मी या विषयावर ते बोलणार आहेत. या कार्यक्रमाला भाविकांनी जरूर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.