छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा रविवारपासून

    दिनांक :29-Sep-2023
Total Views |
गोंदिया, 
Chhatrapati Shivaji Maharaj विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती दुर्गा वाहिनी गोंदिया जिल्हातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि देशातील सांस्कृतिक ऐतिहासिक घटनांची माहिती, शहीद जवानांबद्दल आणि राष्ट्रवादाच्या दिशेने वाटचाल व्हावी, या उद्देशाने रविवार 1 ऑक्टोबरपासून छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
 

Chhatrapati Shivaji Maharaj
 
रविवारी सालेकसा प्रखंडातील दरेकसा येथील महादेव मंदिर येथून होईल. 2 ऑक्टोबर रोजी सडक अर्जुनी, देवरी प्रखंड, 3 रोजी गोरेगाव, 4 ऑक्टोबरला आमगाव, 5 ऑक्टोबरला गोंदिया ग्रामीण, 6 ऑक्टोबर रोजी गोंदियानगरातील उत्तर, दक्षिण, पश्चिम व मध्य प्रखंड, 7 ऑक्टोबरला तिरोडा प्रखंडात यात्रा भ्रमण करेल. Chhatrapati Shivaji Maharaj या दरम्यान प्रमुख ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या हिरक वर्षानिमित्त आणि श्री रामजन्मभूमी मंदिराच्या संकल्पपूर्तीच्या निमित्ताने भारतीय समाजात नवचेतन उत्साह तथा युवकांमध्ये आपल्या पूर्वजांच्या शौर्य जागरण हेतु यात्रेत सर्व धर्म प्रेमी, मंदिर पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दलतर्फे करण्यात आलेे आहे.
 

शौर्य जागरण यात्रेचा स्वागत करा, संध्याकाळी दीप प्रज्वलित करा, सभांमध्ये जास्तीत जास्त संख्येत हिंदू समाज बांधवांना सहभागी करण्याचे आवाहन विहिंपचे जिला मंत्री सचिन चौरसिया यांनी पदाधिकार्‍यांना केले आहे.