गोवारी समाजाचे घरकुलाचे स्वप्न होणार साकारणार

प्रफुल्ल पटेलांचा पाठपुरावा

    दिनांक :29-Sep-2023
Total Views |
गोंदिया, 
Gowari community राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने गत जुलै महिन्यात जारी केलेल्या शासन निर्णत राज्यात इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजना राबविण्यास मंजुरी दिली होती. परिपत्रकात गोवारी समाजाचा समावेश केला नव्हता. त्यामुळे गोवारी समाजबांधवांत नाराजी होती. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील गोवारी समाजबांधवांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत शासनाने योजनेत गोवारी समाजाचा समावेश केला असून सुधारीत जीआर बुधवार 27 सप्टेंबर रोजी जारी केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यासह विदर्भातील गोवारी बांधवांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहेत.
 


gowari Samaj 
 
राज्यात आदिवासींसाठी शबरी व आदिम आवास योजना, अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजना, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी यशंवतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजनांच्या माध्यमातून त्या त्या प्रवर्गातील नागरिकांना लाभ दिला जातो. परंतु विदर्भात मोठ्या प्रमाणावर असलेल्या गोवारी समाजाला योजनेच्या माध्यमातून आजवर घरकुलाचा लाभ दिला जात नव्हता.Gowari community  गोवारी समाज गरीब असून गुरे चारून, शेतमजूरी करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शासनाने त्यांच्या जातीचा एसबीसीमध्ये समावेश केल्याने मोदी आवास योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मोदी घरकुल योजनेत एसबीसी प्रवर्गात मोडणार्‍या गोवारी समाजाला समाविष्ट करून त्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली होती. त्यांनी याची दखल घेत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. बुधवारी राज्य सरकारने यासंदर्भातील जीआर काढीत गोवारी समाजाचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करीत मोदी आवास योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरविले आहे. त्यामुळे गोवारी समाजबांधवांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.
विदर्भातील हजारो गोवारी समाजबांधवांना होणार लाभ
विदर्भात गोवारी समाजबांधव बहुसंख्येने आहे. मात्र समाजाला कुठल्याच घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांना जीवन जगावे लागत आहे. मात्र, आता त्यांचा मोदी आवास योजनेत समावेश झाल्याने दिलासा मिळाला आहे.

विदर्भातील गोवारी समाजबांधव शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. त्यांना कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नव्हता. मात्र, आता त्यांना मोदी आवास योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांची निवासाची अडचण दूर होणार आहे.
प्रफुल्ल पटेल
माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा सदस्य