- धार्मिक स्थळी कापतात खिसे
- यात्रेकरूंना मिळणार्या व्हिसाचा लाभ घेतात
इस्लामाबाद,
जगभरात अटक करण्यात आलेल्या भिकार्यांपैकी 90 टक्के पाकिस्तानी वंशाचे आहेत. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने आपल्या वृत्तामध्ये ही माहिती दिली. या अनुषंगाने बुधवारी सिनेटच्या परदेशी पाकिस्तानींच्या स्थायी समितीला सांगण्यात आले की, पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात Pakistan 'beggar' भिकारी परदेशात जात आहेत. यामुळे मानवी तस्करीला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी समितीला सांगितले की, अनेक भिकार्यांनी सौदी अरब, इराण आणि इराकला भेट देण्यासाठी तीर्थयात्री व्हिसाचा फायदा घेतला आहे. हरामसारख्या पवित्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाकिटमारांना अटक करण्यात आली आहे. नंतर त्यांची ओळख पाकिस्तानी नागरिक अशी झाली. सध्या पाकिस्तानमध्ये सुमारे 50 हजार अभियंते बेरोजगार आहेत.
अन्य एका वृत्तात असेही म्हटले आहे की, परदेशी अधिकार्यांच्या बैठकीत सौदी अरबने पाकिस्तानला हज कोटा देताना काळजी घेण्यास व Pakistan 'beggar' पाकिस्तानला भिकारी आणि खिसेकापू पाठवू नका, असे सांगितले आहे. खासदार राणा मेहमुदुल हसन म्हणाले की, भारत चंद्रावर पोहोचला, पण आपण अजूनही अडखळत आहोत. भारत आणि नेपाळच्या लोकांना जे भत्ते मिळतात, त्यापेक्षा कमी पैशात काम करायला आमचे लोक आता तयार आहेत. सौदी अरब आता प्रशिक्षणाशिवाय येणार्या लोकांऐवजी कुशल मजुरांना प्राधान्य देतो. पाकिस्तानचे 30 लाख लोक सौदीत, सुमारे 15 लाख अमिरातमध्ये आणि 2 लाख कतारमध्ये राहतात. बांगलादेश आणि भारतातील लोक या अर्थाने त्यांच्या पुढे असल्याचे हैदर यांनी सांगितले. त्यामुळे पाकिस्तानी कामगारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या कौशल्याबाबत परदेशी नियोक्त्यांच्या नजरेत चिंता वाढत आहे.
पाकिस्तानातील 9.5 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली
काही दिवसांपूर्वी जागतिक बँकेने पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार पाकिस्तानातील 95 दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. एकूण 24 कोटी लोकसंख्येच्या हे प्रमाण 39.4 टक्के आहे. त्यांची रोजची कमाई 3.65 डॉलर्स म्हणजे 1,048 पाकिस्तानी रुपये आहे. भारतीय चलनात ते 300 रुपये इतके आहे.