रिसोड,
Kho-Kho जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत क्रीडा संकुल वाशीम येथे २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील खो खोच्या स्पर्धा संपन्न झाल्या या खो-खोच्या स्पर्धेमध्ये श्री संत सखाराम महाराज विद्यालय लोणी येथील १७ वर्षे वयोगटातील मुलींचा व १९ वर्षे वयोगटातील मुलांचा खो खो चा संघ विजय होऊन त्या दोन्ही संघाची अमरावती विभाग स्तरावर निवड झाली आहे.
वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे खो खोच्या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये श्री सखाराम महाराज विद्यालय लोणी च्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने मालेगाव तालुक्याचा पराभव करून अमरावती विभाग स्तरावर मजल मारली तर १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने वाशीम तालुक्याचा पराभव करून विभाग स्तरावर त्यांची निवड झाली.Kho-Kho अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्या मधील श्री शंकर विद्यालय तळवेल या ठिकाणी ११ व १२ ऑक्टोंबर रोजी होणार आहेत .श्री सखाराम महाराज विद्यालयाचे मुलींचा आणि मुलांचा संघ विजयी झाल्याने त्या संघातील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सतत तीन वर्षापासून सखाराम महाराज विद्यालय खो खो चे विद्यार्थी, विद्यार्थिनी ची विभाग स्तरावर निवड होत आहे. या विद्यार्थ्यांना तेजस राऊत यांनी मार्गदर्शन केले. खो खोच्या संघाचे विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. सखाराम जोशी, अध्यक्ष गोविंद जोशी, प्राचार्य कल्याण जोशी यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.