नागपूर,
karmyogi foundation-ngp जगाने दखल घ्यावी असा कर्मयोगी फाऊंडेशनचा गणेशोत्सव,तीन वर्षांपासून नाविन्यपूर्ण कल्पना राबवत साजरा करत आहे. यावर्षी त्यांनी कर्मयोगीचा गणेशोत्सव दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गौरी गणेशांच्या चरणी, या शीर्षकाखाली हा उपक्रम ११ दिवस चालणार आहे. karmyogi foundation-ngp या उपक्रमातुन दैदिप्यमान यश मिळविणारे विद्यार्थी गौरी गणेशांच्या जिद्द व संघर्षाला नमन करत त्यांना सन्मानित करून, चांगला माणूस बनत, सेवा व जबाबदारी हा धर्म जपून आपला मानवी जन्म सार्थक करण्याचा संदेश आजच्या माणुसकी हरवलेल्या या स्वार्थी जगात प्रत्यक्ष कृतीतून दिल्या जात आहे. karmyogi foundation-ngp विशेष म्हणजे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आदर्श लोकांच्या हस्ते सपत्नीक या गौरी गणेंशांना सन्मानित करण्यात येत आहे.
या चांगल्या उपक्रमाला सपत्नीक ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. पुष्पा रक्षक यांचे हस्ते तेजस राऊत या विद्यारथ्यांचा आणि त्याच्या आईवडीलांचा सन्मान करण्यात आला. karmyogi foundation-ngp बुटीबोरीचे कर्मयोगी फांऊडेशनचे श्रमिक हात समाजातल्या गरीब कष्टकरी कुटुंबातील अभ्यासू विद्यार्थ्यांना शोधून त्यांना भावी शिक्षणासाठी त्यांचा सन्मान करून तन-मन-धनाची हिम्मंत देतात. खऱ्या जीवंत गौरी-गणेशांची आराधना करतात. तरूण मित्रांनो पुस्तकांसोबतच सभोवतालचा समाजवाचन शिकां तुम्हाला त्यातूनच प्रगतीच्या वाटा सापडतील. karmyogi foundation-ngp जीवनातील अपयशाच्या वेळेस तुमच मन आत्महत्येसारखा मार्ग न स्विकारता हिम्मतीने आपल ध्येय गाठेल. थोर संत महापुरूषांचे विचार तुमच्या सोबतीला नेहमीच असू द्या यशाचे आपण वाटेकरी बनाल. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ज्ञानेश्वर रक्षक यांनी असे विचार व्यक्त केले.
सौजन्य : ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र