पुष्पा चिंतामणी यांचा अमृत महोत्सव सोहळा

    दिनांक :03-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
येथील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते Pushpa Chintamani पुष्पा चिंतामणी यांचा अमृत महोत्सव सोहळा चिंतामणी क्लासेसमध्ये दिमाखात पार पडला. श्री सत्यसाईबाबांच्या ‘आई ही देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, तिची अवज्ञा करू नका’ याला अनुसरून हा सोहळा साजरा करण्यात आला. सुरुवातीस श्री सत्यसाई बाबांची भजने झालीत. नंतर आईंची तुला किराणा किटस्ने करून त्या किराणा वस्तू गरजू कुटुंबांना वाटण्यात आल्या. ज्येष्ठ कवी दीपक आसेगावकर यांनी आईंवर रचलेली कविता वाचून दाखविली. सर्वांनी मातोश्री पुष्पा चिंतामणी यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला.
 
Pushpa Chintamani
 
या Pushpa Chintamani प्रसंगी श्री सत्यसाई समितीचे सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळींची मोठी हजेरी होती. त्यात विनोद जिल्हेवार, डॉ. गोटे, डॉ. रुणवाल, डॉ. ताटेवार, डॉ. पंकज जयस्वाल, तहसीलदार इसळकर, संजय कोरटकर, पत्रकार रवी देशपांडे, अखिलेश अग‘वाल, अनिल वाघ, कैलास उदावंत, बोकन, दिलीप शहाणे, मु‘याध्यापक चव्हाण, साई समितीचे संदीप चव्हाण, गजानन आर्गुलवार, गटविकास अधिकारी संजय राठोड यांचा समावेश होता.