संकटातील पिकांना पावसामुळे संजीवनी

    दिनांक :03-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
अनेक दिवस दडी मारल्यानंतर राळेगाव तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास Rain revives पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोमेजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली. यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह इतर पिके कोमेजली होती. ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातही विजेचा अडसर होताच. पावसाअभावी सोयाबीन पीक पूर्णत: वाया जाणार असल्याचे दिसत होते.
 
Rain revives
 
कापूस व सोयाबीनवर विविध कीड व अळ्यांनी आक‘मण केले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकरी महागडे कीटकनाशकाची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. Rain revives पावसाने गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारल्याने उष्णतेच्या प्रमाणातसुद्धा प्रचंड वाढ झाली होती. मात्र पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र ओलावा निर्माण झाला. तालुक्यात शेंगा लागलेल्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनला दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता परतून आल्यामुळे जीवदान मिळाले आहे. मागील पंधरवड्यातील अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झाला असल्याने सोयाबीन आणि इतरही पिके आता बहरत आहेत.
 
 
सोयाबीनवर काही प्रमाणात कीडींचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशकांची फवारणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्याने पिकास संजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.