अंतराळ विज्ञान समजावून सांगण्याची, समजून घेण्याची गरज

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

    दिनांक :03-Sep-2023
Total Views |
इस्रो वॉल म्युझियमचे उद्घाटन
नागपूर,
space science अंतराळ विज्ञानातील प्रयोग आणि या क्षेत्रातील आविष्कार हे मोठे यश आहे. आज माध्यमे विकसित झाल्यामुळे प्रत्येकाला याबद्दलची माहिती सहज मिळते. पण, त्याच्या खोलात जाऊन हे अंतराळ विज्ञान समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 

space science 
 
इस्रोतर्फे नोंदणीकृत इंडिक इन्स्पिरेशन या संस्थेच्या वतीने इस्रो वॉल म्युझियमचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. पर्सिस्टंट सभागृहात आयोजित या कार्यक‘माला नरेश चाफेकर, सुनील जलिहल, सीमा तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन गडकरी म्हणाले की, भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली आणि आज सूर्याच्या दिशेनेही झेप घेतली. शास्त्रज्ञांनी केलेले परिश्रम आणि अंतराळ विज्ञानाचे प्रयोग शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. space science ‘तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळेच रोजगार निर्माण होत आहेत आणि समृद्धीही शक्य आहे. पुढच्या पिढ्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या अंगाने अधिक समृद्ध करायच्या असतील तर आजच्या शालेय विद्यार्थ्यांना या प्रयोगांची सखोल माहिती देण्याची गरज आहे. यातून उद्याच्या शास्त्रज्ञांना नवी दृष्टी मिळेल. कारण चांगला दृष्टीकोण वैयक्तिक प्रगतीसह देशालाही प्रगतीचा मार्ग दाखवतो. शाळेत विद्यार्थ्यांना काय शिकविले जात आहे, याकडेही लक्ष दिले पाहिजे. रोजगार देणारे, विज्ञान-तंत्रज्ञानातील नव्या प्रयोगांची प्रेरणा देणारे आणि समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक बाबींचे ज्ञान देणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे, असेही गडकरी म्हणाले.