गांधी जयंतीला वर्धा जिल्ह्यातून ओबीसी जागर रथयात्रेचा शुभारंभ

30 Sep 2023 20:25:29
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
OBC Jagar Rath Yatra : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजनेची माहिती ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपर्क से समर्थन हे ब्रिदवाक्य घेऊन ओबीसी जागर रथयात्रा 2 ते 12 ऑक्टोबरदरम्यान काढण्यात येणार आहे. गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी हिंगणघाट तालुक्यातील पारडी नगाजी येथुन या यात्रेला सुरूवात तर पोहरादेवी येथे समारोप होणार असल्याची माहिती भाजपा ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी दिली. स्थानिक विश्रामगृह येथे आज 30 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आमदार डॉ. पंकज भोयर, भाजपा शहर अध्यक्ष नीलेश पोहेकर, मंगेश झाडे यांची यावेळी उपस्थिती होती.
 
OBC Jagar Rath Yatra
 
गांधी जयंतीनिमित्त बापूकुटी सेवाग्राम येथे OBC Jagar Rath Yatra भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे सकाळी 9 वाजता अभिवादन करून पारडी नगाजी ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. संजय गाते पुढे म्हणााले की, ही यात्रा ओबीसी समाजाला विश्‍वास देण्यासाठी काढण्यात येणार असुन 44 विधानसभा व 9 लोकसभा क्षेत्रात 1965 किमीचा प्रवास करणार आहे. समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी जि. वाशीम येथे होईल.
 
 
ओबीसी जागर यात्रा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा या यात्रेचा मार्ग राहील. या यात्रेतील पहिली सभा हिंगणघाट येथे होईल. त्यानंतर 13 मेळावेही यात्रेदरम्यान होणार आहे. OBC Jagar Rath Yatra मुक्कामाच्या गावात सकाळी त्या त्या गावातील नागरिकांसोबत संवाद साधून मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कार्यकाळातील कामांची माहिती देऊन ओबीसी समाजात विश्‍वास निर्माण करण्यात येणार आहे. या यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्राचे प्रभारी आमदार डॉ. आशिष देशमुख व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते करणार आहेत. केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती या निमित्ताने समाजाातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले. दरम्यान, 2 ऑक्टोबर रोजी बापूकुटी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्बारे देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0