ऑक्टोबर मध्ये फिरायला जायचं आहे का ?

30 Sep 2023 13:55:00
tour in October ऑक्टोबर चा महिना फिरायला जाण्याकरिता खूप योग्य असतो. या महिन्यात चांगल्या हवामानाबरोबरच अनेक सुट्ट्या देखील असतात. त्यामुळे तुम्हीही ऑक्टोबर महिन्यात फिरायला जायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही चांगल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.या वातावरणात ऊन बऱ्यापैकी कमी असतं,आणि फिरायच्या दृष्टीने वातावरण देखील छान असतं.आणि सुट्यादेखील बऱ्याच असतात. गांधी जयंती ,दसरा यासारख्या सुट्ट्या येतात;त्यामुळे या महिन्यात फिरायला जाणे फारच योग्य ठरेल.आम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात भेट देण्यासारख्या काही उत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
 
 
fira
 
हम्पी
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये कर्नाटकातील हम्पी शहराचे नावही नोंदवले गेले आहे. हे शहर प्राचीन मंदिरे, स्मारके आणि अखंड रचनांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.ज्यांना ऐतिहासिक वास्तू पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी हंपी हे एक योग्य ठिकाण आहे.येथे तुम्ही विरुपाक्ष मंदिर, विजय विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, नद्यांच्या काठावर वसलेले खंडर,राणीचे स्नान कुंड आणि लक्ष्मी नारायण मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता....
 

humpy
 
आग्रा-
जगातील सात आश्चर्यांमध्ये गणला जाणारा ताजमहाल याच शहरात आहे. यमुना नदीच्या काठावर वसलेल्या ताजमहालचे नाव जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या प्रवासाच्या यादीत आहे.आग्राला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर महिनाच आहे. आप यहां ताजमहल के अलावा, आगरा फोर्ट, जामा मस्जिद, मेहताब बाग, अकबर का मकबरा (सिकंदरा), फतेहपुर सीकरी भी जा सकते हैं.

aagra 
 
कोलकाता-
तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत कोलकाताला भेट देऊ शकता. ऑक्टोबर महिन्यात येथे दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. येथे सुमारे आठवडाभर दुर्गापूजेचा उत्सव साजरा केला जातो.याशिवाय निक्को पार्क, व्हिक्टोरिया मेमोरियल, कालीघाटातील कालका मंदिर आणि बेलूर मठ यांसारख्या ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता.
 

kolkatta
 
ऋषिकेश-
ऑक्टोबर महिन्यात तुम्ही ऋषिकेशलाही भेट देऊ शकता.येथे गंगा नदीच्या काठावर बसून थंड हवेचा आनंद लुटता येतो. तसेच, येथे जाऊन तुम्हाला खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटेल.तुम्ही ऍडव्हेंचर करायला आवडत तर हि जागा तुमच्यासाठी खास आहे. नीळकंठ महादेव मंदिर, राम झुला, लक्ष्मण झुला, जानकी पूल, नीर गड धबधबा, ऋषीकुंड, स्वर्ग आश्रम, बीटल्स आश्रम आणि त्रिवेणी घाट ही येथील आकर्षणाची प्रमुख केंद्रे आहेत…
 

hrushikesh 
दार्जिलिंग-
दार्जिलिंगमध्ये वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. पश्चिम बंगालमध्ये असलेले हे ठिकाण भारतातील सर्वोच्च हिल स्टेशन मानले जाते. ऑक्टोबर महिन्यातील प्रवासाचा सुखद अनुभव तुम्हाला येथून परत जाऊ देणार नाही. येथे येऊन तुम्ही पद्मजा नायडू पार्क, प्राणीशास्त्र उद्यान, रॉक गार्डन, पीस पॅगोडा, टायगर हिल, घुम मठ, सेंट अँड्र्यू चर्च आणि सिंगलिला नॅशनल पार्क पाहू शकता...
 

darjling 
Powered By Sangraha 9.0