जयप्रकाश नगरात अस्वच्छतेचे साम्राज्य

30 Sep 2023 16:46:34
नागपूर,
jayprakash nagar-nagpur धरमपेठ चौथा लेआउट, पाचवा लेआउट, रिझर्व बँक कॉलनी, जयप्रकाश नगर ,गोविंद नगर व पंचवटी सोसायटी येथील रस्त्याच्या कडेला कचरा कायम पडलेला असतो. बेवारस कुत्रे व गाई कचऱ्याचा ढिगारा अस्ताव्यस्थ करीत असतात. साचलेल्या कचऱ्यामुळे डेंगू, मलेरिया यांचा येथील नागरिकांना सामना करावा लागतो. jayprakash nagar-nagpur गडरचे झाकण बऱ्याच ठिकाणी उघडे तर काही तुटले आहे जयप्रकाश नगर कॉलनीतील रस्त्याच्या दुतर्फा असलेला परिसर स्वच्छ करावा, आवश्यक त्या ठिकाणी सुका कचरा व ओला कचऱ्याच्या पेट्या बसविण्यात याव्या. jayprakash nagar-nagpur पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी जाणारे मार्ग वेळोवेळी स्वच्छ करून मोकळे करावे. याकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे असे आवाहन नागरिकांनी केले आहे.
 

jayprakash nagar-nagpur 
 
सौजन्य : विजय दाणी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0