मानोरा,
मागील पंधरा ते विस दिवसांपासून (Crops Danger) पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके तापत्या उन्हामुळे करपु लागली आहे. त्यामध्ये मानोरा विज वितरण कंपनी कडून भारनियन आणि काही भागात विद्दुत पुरवठा खंडीत होत असल्याने सिंचनाखाली येत असलेल्या कृषी पंपाचा पुरवठा खंडित होऊन कृषीपंप धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अखंड विजेसाठी विज वितरण कंपनीला निवेदने, तक्रारी केल्या परंतु विज वितरण अधिकार्यांना कुठल्याही प्रकारची जाग येत नसल्याकारणाने विज वितरण कंपनी विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष शाम पवार विज आक्रमक भूमिका घेणार असल्याचे निवेदन वरिष्ठ अधिकार्यांना दिले आहे.
श्रावण मासातीलसण उत्सव व बंजारा समाजाचा तीजोत्सव असल्याने गव्हा, दापुरा गिरोली, शेंदुरजना, पोहरादेवी फिडर व ग्रामीण भागातील भारनियमन सुरू केले आहे. ऑगस्ट महिन्यात आधीच. Crops Danger पाऊस न आल्याने पिके धोक्यात आली असून वीजेचा घरगुती वापर वाढला आहे.मागणी व पुरवठा समिकरण बिघडल्याचे कारणे देत महावितरणने भारनियमन सुरू केले आहे, त्याचा फटका शेतकर्यांसह घरगुती ग्राहकांनाही बसू लागला आहे. अघोषित असलेले हे भारनियमन तात्काळ बंद करून जनतेला दिलासा देण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसापासून अचानक पणे गव्हा फिडर व तालुक्यातील गाव खेड्यात सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ७ ते ९:३० असे भारनियमन चालू करण्यात आले असून श्रावण महिन्यात विविध सण उत्सव साजरे करण्यात येत असतात.
बंजारा समाजातील तिज उत्सव हा दहा दिवस चालणारा उत्सव देशभरात प्रसिद्ध असणार्या तीर्थक्षेत्र बंजारा तीर्थक्षेत्र पोहरागड हे ठिकाण मानोरा तालुक्यात असल्याने या उत्सवाला तालुक्यात मोठ्या धुमधडाक्यात व हर्षोल्हासात साजरा करण्यात येतो. तसेच तीर्थक्षेत्र आसोला येथे श्रावण महिन्यामध्ये विशेषतः Crops Danger सोमवारी आणि गव्हा तेथे मॉ भवानीचे जागृत देवस्थान असून श्रावण महिन्यात गव्हा येथे तालुक्यातील हजारो भाविक सकाळी व संध्याकाळी दर्शनासाठी येत असतात व तीज उत्सवाही सकाळी व संध्याकाळी प्रत्येक तांड्यातील महिला संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात सकाळ संध्याकाळी धार्मिक विधी करीत असतात त्यामुळे श्रावण महिन्यात अतिरिक्त वीज भारनियमन बंद करून तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यात यावा. अशी मागणी करत जर हे अतिरिक्त भारनियमन बंद केले नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे शाम पवार, यांनी दिला आहे.