वाशीम,
PM Kisan Yojana प्रधानमंत्री किसान योजनेची सन १९-२० पासुन अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भुमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्यात आहे. तरी शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई केवायसी पुर्ण करणार नाही किंवा बँक खाती आधार संलग्न करणार नाहीत, त्यांची नावे या योजनेतुन वगळण्यात येणार आहे.

ई केवायसी करण्याकरीता माहे मे, जुलै व ऑगष्ट महिन्यात कृषी विभागाच्या वतीने मोहीम राबविण्यात आली आहे. परंतु अद्यापही जिल्हयातील १४ हजार ८२९ लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित दिसुन येत आहे.PM Kisan Yojana तसेच ११ हजार ११७ लाभार्थ्यांची आधार सिडींग प्रलंबीत आहे. संपर्क करुनही ई केवायसी व आधार सिडींग करण्याकरीता प्रतिसाद देत नसलेल्या व लाभार्थ्याचे नाव वगळण्यासाठी शासनस्तरावरुन सुचना प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत ई केवायसी व बँक खाते आधार संलग्नीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी ६ सप्टेंबर पर्यंत ई केवायसी व बँक खाते आधार संलग्नीसकरण करण्यात यावे. न केल्यास ७ सप्टेंबर पासून नावे रद्द करण्यायची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.