पालोरा,
Dahi handi जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पालोरा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
इयत्ता सातवीच्या मुलींच्या संघाने ही दहीहंडी फोडण्यात यश मिळविले. Dahi handi विजेत्या चमूला मुख्याध्यापक व्ही.सी. मेश्राम यांचेकडून रोख 501 रुपये बक्षिस देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका कांबळे, शेंडे, राऊत, सावरकर, बन्सोड, शिक्षक मदन मेश्राम, रंदये, निमजे, सतिश समरीत, सचिन मेश्राम यांच्यासह कर्मचारी शेंडे, शेंदरे, उईके यांनी सहकार्य केले.