विद्याभारती शाळेत दहीहंडी उत्सव

    दिनांक :07-Sep-2023
Total Views |
वाशीम,
Dahi Handi Utsav येथील विद्याभारती शाळेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेचे संचालक सुमित मिटकरी, मुख्याध्यापक नितेश मिटकरी, पर्यवेक्षक विजय गोटे यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण केले. तसेच दहीहंडीचे पूजन करून श्रीकृष्णाच्या वेशभूषा मधील विद्यार्थ्यांच्या हस्ते जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली.
 
 
dbdhdys
 
यावेळी आकर्षक अशा राधा कृष्णाच्या वेशभूषेमधील विद्यार्थी या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी गोविंदाच्या गाण्यावर गरबा नृत्य केले. शाळेतील वातावरण Dahi Handi Utsav गोविंदा आला रे आला या नादघोषाने दणाणून गेला. अतिशय उत्साहाने सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडी काल्याचा प्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.