पोलिस पाटील पदभरती अर्ज प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात

    दिनांक :07-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोरगाव, 
अर्जुनी मोरगाव उपविभागातील रिक्त असलेल्या Police Patil recruitment पोलिस पाटील पदाकरिता उपविभागीय कार्यालयाच्या वतीने बिंदू नामावलीनुसार आरक्षण काढल्यानंतर 8 सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजतापर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरवा लागणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी दिली.
 
Police Patil recruitment
 
ते अर्जुनी मोरगाव उपविभागातील अर्जुनी मोरगाव व Police Patil recruitment सडक अर्जुनी तालुक्यात होणार्‍या पोलिस पाटील पद भरती प्रक्रियेची माहिती देताना बोलत होते. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील आरक्षण सोडत 21 ऑगस्ट रोजी निघाल्यानंतर उमेदवारांमध्ये गावागावात भरती प्रक्रियेबाबत मोठी उत्सुकता लागून होती. त्याची प्रतीक्षा अखेर संपली. यासंदर्भात माहिती देताना उपविभागीय शहारे म्हणाले, या दोन्ही तालुक्यातील पोलिस पाटील पद भरतीकरिता अहर्ताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज एचटीटीपीः//अर्जुनी मोर.पीपीभरती.इन या संकेतस्थळावरुन मागविण्यात आले. याच संकेतस्थळावरील अटी व शर्ती पूर्ण करणार्‍या केलेल्या अर्जाला ग्राह्य धरण्यात आले.
 
 
पोलिस पाटील पदाकरिता लेखी परीक्षा ही 80 गुणांची तर तोंडी परीक्षा मुलाखत ही 20 गुणांची होणार आहे. Police Patil recruitment लेखी परीक्षेतील एकूण 80 गुणांपैकी किमान 45 टक्के म्हणजेच 36 गुण प्राप्त केलेल्या अर्जदारांमधील उच्चतम गुण मिळवलेल्या उमेदवारांना तोंडी परीक्षेला बोलविण्यात येईल. याबाबतची माहितीवरील संकेतस्थळावर तथा तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय संबंधित गावाच्या साझ्यातील तलाठी कार्यालय या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच भरतीची सर्व प्रक्रियेसंदर्भात माहिती उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी पत्रपरिषदेत दिली आहे.
 
 
काही गावात बिंदू नामावलीनुसार निघालेल्या आरक्षणावर आक्षेप नोंदविण्यात आला. अशा आक्षेप घेतलेल्या गावातील दिलेल्या आरक्षणानुसार जर उमेदवारी अर्ज अप्राप्त झाले तर त्या गावातील 21 सप्टेंबरनंतर नव्याने आरक्षण ठरवून अर्ज मागविण्यात येईल व या सगळ्यांची एकत्रित परीक्षा आलेल्या अर्जाच्या संख्येनुसार विचार करून 15 ऑक्टोंबरपर्यंत घेण्याचा मानस असल्याची माहितीही उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी दिली.