शहनाज अख्तरच्या ‘भजन संध्ये’ने वणीकर मंत्रमुग्ध

07 Sep 2023 18:46:14
वणी, 
येथील शासकीय मैदानावर रविवार, 4 सप्टेंबर रोजी Shahnaz Akhtar शहनाज अख्तर यांच्या भजनसंध्येचे आयोजन भाजपा नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. या भजनसंध्येत उपस्थित हजारो भाविक श्रोते मंत्रमुग्ध झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव समितीद्वारा या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
Shahnaz Akhtar
 
या भजन संध्येत गायिका Shahnaz Akhtar शहनाज अख्तर यांनी त्यांचे सुप्रसिद्ध गीत ‘मुझे चढ़ा है भगवा रंग’ यासह महादेव, श्रीरामांची भजने गाऊन भाविकांना तल्लीन केले. अनेक भजनांवर भाविकांनी नाचून प्रतिसाद दिला. यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण मैदान गुंजले होते. दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत विजय चोरडिया यांचा वाढदिवसदेखील साजरा करण्यात आला. या कार्यक‘माला केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, संजय निमकर, किरण दिकुंडवार, निकेत गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत चोरडिया यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0