रिसोड,
Tehsildar Pratiksha Tejankar शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवायचे असेल तर त्यासाठी फक्त प्रशासनानेच नव्हे तर सामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. प्लास्टिक हे किती हानिकारक आहे आपण प्लास्टिक मुळे रोगराई पसरत असते. असं प्रतिपादन तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी केले.
रिसोड शहरात जनजागृती मोहीम व तसेच प्लास्टिक वापरणार्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असुन तहसील कार्यालय नगर परिषद, समता फाउंडेशन, जमात ऐ इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यानामानाने सदर मोहीम राबवली जाणार असून घराघरापर्यंत ही जनजागृती केली जाणार आहे. Tehsildar Pratiksha Tejankar या अनुषंगाने आज ८ सप्टेंबर रोजी नगर परिषद च्या सभागृहामध्ये सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सह विचार सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मदनसेठ बगडिया, मोहन देशमुख हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पट्टेबहादूर यांनी केले तर यावेळी सभेमध्ये उपस्थिताना तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी कोणत्या प्लास्टिक वर बंदी आहे व कोणता वापरू शकतो प्लास्टिक मध्ये कोणत्या प्रकारचे हानिकारक आहे यावर सविस्तर माहिती दिली. यावेळी सभेमध्ये उपस्थिततांसोबत सदर विषयावर चर्चा करण्यात आली. Tehsildar Pratiksha Tejankar सभेत जमात ऐ इस्लामी हिंद चे जिल्हाध्यक्ष शेख वकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना शहरांमध्ये स्वच्छता ठेवून प्लास्टिकचा वापर टाळू या संदर्भात शपथही दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. जायभाये यांनी केले तर आभार राजेश पट्टेबहादूर यांनी मानले. यावेळी सभेमध्ये व्यापारी पत्रकार नगरपरिषद कर्मचारी अधिकारी कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.