MPDA जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी 7 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत गोंदिया शहरातील सराईत व धोकादायक गुन्हेगाराला एका वर्षाकरिता भंडारा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. शंकर ऊर्फ गुरु राजाराम पटले (25, रा. संजयनगर) असे त्याचे नाव आहे. एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबध्दतेची जिल्ह्याच्या इतिहासामधील ही पहिलीच कारवाई आहे.या गुन्हेगारांवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, चाकूने गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे अश्या विविध प्रकारचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या निर्देशान्वये अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने, तिरोडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक चद्रकांत सुर्यवंशी, सपोनि सागर पाटील, पोहवा जागेश्वर उईके, कवलपालसिंह भाटिया, सुदेश टेंभरे, प्रमोद चव्हाण, दीपक रहांगडाले, सतीश शेंडे, पोशि दिनेश बिसेन, मुकेश रावते, करण बारेवार, सुभाष सोनवणे, अशोक रहांगडाले यांनी आरोपीविरुद्ध कारवाई करून एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर केला होता.MPDA त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोहवा चेतन पटले यांनी तसा प्रस्ताव तयार तो मंजुरीकरिता पोलिस अधीक्षकामार्फत जिल्हा न्यायदंडध्किारी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी 7 सप्टेंबर रोजी गुन्हेगारासंदर्भात स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला.