जी-२० शिखर परिषद देणार जागतिक राजकारणाला दिशा !

g20 summit 2023 आंतरराष्ट्रीय राजकारणातील विघ्नहर्ता

    दिनांक :08-Sep-2023
Total Views |
अग्रलेख
g20 summit 2023 जी-२० देशांच्या ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या द्विदिवसीय शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. ही परिषद ‘न भूतो न भविष्यती' व्हावी, असा मोदी सरकारचा आग्रह आहे; नुसता आग्रहच नाही तर तसे प्रयत्नही करण्यात आले आहेत. जी-२० म्हणून या परिषदेत फक्त २० सदस्य देशांचेच नाही तर सदस्य नसलेल्या देशांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. g20 summit 2023 याशिवाय जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी, जागतिक आरोग्य संघटना अशा जागतिक पातळीवरील १४ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे ही परिषद ऐतिहासिक तसेच जागतिक राजकारणाला दिशा देण्यात यशस्वी होणार, यात शंका नाही. g20 summit 2023 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून म्हणजे २०१४ नंतर भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. भारताबद्दल जागतिक पातळीवर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील कोणत्याही समस्येवर तोडगा काढताना आज भारताची भूमिका विचारात घेतली जाते.
 
 
g20 summit 2023
 
स्वत:ला महाशक्ती म्हणवणारे देशही कोणत्याही मुद्यावर भारताचे म्हणणे टाळू शकत नाही. g20 summit 2023 त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, याचा अनुभव अनेक प्रसंगांत आपण घेतला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात मध्यस्थी करण्याची तयारी भारताने दाखवली होती. त्यामुळेच भारताकडे विश्वगुरू म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे. काही वर्षांपूर्वी सगळे जग भारताकडे विकसनशील देश म्हणून पाहात होते. त्यामुळे जागतिक राजकारणात भारताचा नगण्य असा सहभाग राहात होता. आता मात्र भारताकडे विकसित देश म्हणून पाहिले जात आहे. g20 summit 2023 भारताने आपल्या बाजूला राहावे, असा प्रयत्न चीन, रशिया आणि अमेरिकेसारख्या महाशक्तीही वेळोवेळी करीत असतात, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. विकसनशील देशाचे विकसित देशात रूपांतर करण्याचा चमत्कार मोदी यांच्या नेतृत्वाने घडवला आहे, हे मान्य केलेच पाहिजे. त्यामुळेच तर ‘मोदी है तो मुमकिन है,' असे म्हटले जाऊ लागले. g20 summit 2023 मुळात एखादे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आयोजन करणे, हे वाटते तितके सोपे काम नसते. त्यातच एक-दोन नाही तर तब्बल तीन डझनांवर देशांचे राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख आपल्याकडे येणार असताना त्यांच्या आदरातिथ्यात आणि सुरक्षा व्यवस्थेत कोणतीच कमतरता राहणार नाही, हे पाहणे मोठे आव्हानात्मक असते.
 
 
 
मुळात भारतीय मानसिकता ही ‘अतिथी देवो भव' सोबत ‘वसुधैव कुटुंबकम्' यावर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे भारतीय व्यक्ती एकवेळ स्वत: उपाशी राहील, पण आलेल्या पाहुण्याला मिष्टान्नाचे जेवण दिल्याशिवाय राहणार नाही. g20 summit 2023 त्यामुळेच या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी फक्त सरकारी यंत्रणाच नाही तर राजधानी दिल्लीतील जनताही मोठ्या उत्साहाने कामाला लागली आहे. आपल्या घरात चार पाहुणे येणार असताना त्यांचे आदरातिथ्य करताना यजमानाची फेफे उडत असते. इथे तर तीन डझनांवर देशांचे राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख जवळपास तीन दिवसांसाठी आपले पाहुणे म्हणून राहणार आहेत. g20 summit 2023 या पाहुण्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्व शासकीय यंत्रणा डोळ्यात तेल घालून घेत आहे. ते स्वाभाविकही आहे आणि आपली नैतिक जबाबदारीही. जी-२० देशांच्या समूहाचे यजमानपद गतवर्षी भारताकडे आल्यानंतर देशातील ६० शहरांत जी-२० चे वेगवेगळ्या स्वरूपाचे २२० कार्यक्रम झाले. g20 summit 2023 राजधानी दिल्लीत होत असलेली जी-२० देशांची ही १८ वी शिखर परिषद आहे. याआधी अशा १७ बैठकी त्या त्या वर्षी या समूहाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या देशांत आयोजित झाल्या होत्या. २००८ मध्ये स्थापन झालेल्या जी-२० ची पहिली बैठक अमेरिकेत झाली होती.
 
 
 
सुरुवातीला फ्रान्स, जपान, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, इटली आणि अमेरिका असे सात देश जी-७ म्हणून एकत्र आले होते. १९९८ मध्ये त्यात रशियाही सहभागी झाला. २००७ मध्ये जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. g20 summit 2023 त्यामुळे अर्थव्यवस्थेसह जगाला भेडसावणाèया अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जी-७ चा विस्तार करीत जी-२० ची स्थापना करण्यात आली, म्हणजे आणखी १३ देशांना त्यात सहभागी करून घेण्यात आले. जी-२० मध्ये सहभागी असलेले सर्वच देश विकसित देश आहेत. जागतिक जीडीपीत जी-२० देशांचा वाटा ८५ टक्के तर जागतिक उत्पादनातील त्यांचा वाटा ८० टक्के आहे. यावरून जी-२० देशांचे जागतिक अर्थव्यवस्थेत असलेले स्थान समजू शकते. g20 summit 2023 संयुक्त राष्ट्राला जशी वैधानिकता आहे, तशी वैधानिकता जी-२० समूहाला नाही. संयुक्त राष्ट्राचा निर्णय मानणे जगातील सर्व देशांवर बंधनकारक असते. तो मान्य न करणाèया देशावर प्रतिबंध लावण्याची दंडात्मक शक्तीही संयुक्त राष्ट्राकडे आहे. मात्र, असा कोणताही दंडात्मक अधिकार नसतानाही जी-२० गेल्या २५ वर्षांपासून यशस्वी आणि प्रभावीपणे काम करीत आहे, यातच त्याचे खरे यश आहे. g20 summit 2023 दंडात्मक शक्तीपेक्षा नैतिक शक्ती अधिक प्रभावी ठरते, हे जी-२० देशांच्या आतापर्यंत झालेल्या अनेक शिखर परिषदांतून स्पष्ट झाले आहे.
 
 
 
आर्थिक समस्यांसह शिक्षण रोजगार, खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रित करणे तसेच जलवायू परिवर्तनासह अनेक मुद्यांवर या परिषदेत चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. g20 summit 2023 विशेष म्हणजे सर्व सदस्य देश या निर्णयाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करतात. दिल्लीत होणाऱ्या शिखर परिषदेत अशाच अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे संयुक्त घोषणापत्रही जारी केले जाणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे दोघे या शिखर परिषदेसाठी भारतात येणार नसले, तरी शी जिनपिंग ग याआधी दोन वेळा भारतात येऊन गेले आहेत. या दोघांचीही न येण्याची वेगवेगळी कारणे असली तरी त्यांच्या देशांचे प्रतिनिधी मंडळ या परिषदेत सहभागी होणार आहे. g20 summit 2023 त्यामुळे या दोन देशांनी या परिषदेवर बहिष्कार घातला, असे कोणी समजण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदी यांचे रशियाचे राष्ट्रपती पुतिन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याशी तेवढेच मैत्रिपूर्ण संबंध आहेत. खरं म्हणजे हे तिघेही आपापल्या देशांचे राष्ट्रपती आहेत तर मोदी पंतप्रधान. g20 summit 2023 असे असतानाही या तीन नेत्यांनी मोदी यांना आपला समकक्ष समजून वागवले, त्यांचा सन्मान केला. मोदी आमचे मित्र असल्याचे या तिन्ही देशांचे राष्ट्रपती मोठ्या आदराने आणि अभिमानाने सांगतात, तेव्हा समस्त १४० कोटी भारतीयांची छाती आनंदाने फुगून जाते.
 
 
 
अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत जी-२० चे नेतृत्व भारताकडे आले होते; मात्र त्याही स्थितीत किंचितही विचलित न होता भारताने वैश्विक नेतृत्व केले. आपल्या समन्वयवादी भूमिकेचा जगाला परिचय करून दिला. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पृष्ठभूमीवर चीनने रशियाची पाठराखण करण्याची भूमिका घेतली असताना रशिया आणि अमेरिकेचे आधीच तणावपूर्ण असलेले संबंध आणखी तणावपूर्ण झाले असताना जी-२० चे नेतृत्व करताना पंतप्रधान मोदी यांच्या कौशल्याची कसोटी लागणे स्वाभाविक होते. g20 summit 2023 कारण, एकदुसऱ्याच्या जिवावर उठलेले चीन, रशिया आणि अमेरिका हे महाशक्ती समजले जाणारे देश जी-२० चे सदस्य देश आहेत. त्यामुळे या तिन्ही देशांना सांभाळणे आणि हाताळणे वाटते तितके सोपे नव्हते. तरीसुद्धा हे शिवधनुष्य मोदी यांनी नुसते यशस्वीपणे पेललेच नाही तर मुत्सद्दीपणाची भूमिका संयमितपणे बजावत जगातील तणाव कमी करण्यात तसेच युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप येण्यापासून वाचवले, हे मान्य करावेच लागेल. त्यामुळेच मोदी यांचा उल्लेख आंतरराष्ट्रीय राजकारणातील विघ्नहर्ता म्हणून करायला हरकत नाही. g20 summit 2023 जी-२० परिषदेच्या यशस्वी आयोजनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल, हे निश्चित.