ढोंगी आणि पाखंडी !

udhayanidhi stalin, priyank kharge निषेध दूर नाराजीसुद्धा नाही

    दिनांक :08-Sep-2023
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
udhayanidhi stalin, priyank kharge तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खडगे, डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी सनातन धर्माविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय वक्तव्य केले. हे तीनही लोक ‘भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी'चे (आय. एन. डी. आय. ए.) सदस्य आहेत. udhayanidhi stalin, priyank kharge आता ब्राह्मणवादाला विरोध करणारी द्राविडी संस्कृती असून त्याला जुना इतिहास असल्यामुळे स्टॅलिनने असे वक्तव्य करणे स्वाभाविक आहे आणि द्राविडी स्थानातून सनातन धर्मास विरोध होणे, ही बाब आश्चर्यकारक नसल्याचा निर्लज्ज दाखला देत त्यांची पाठराखण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील पाखंडी लोक करताना दिसत आहेत. udhayanidhi stalin, priyank kharge
आम्हाला हिंदुत्व कोणी शिकवू नये, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असे बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगणाऱ्या या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी डीएमकेचे स्टॅलिन, काँग्रेसचे खडगे आणि डीएमकेचे ए. राजा यांचा कोथळा काढणे तर सोडा; साधा निषेधदेखील केला नाही. निषेध तर दूर राहिला; आपली नाराजीसुद्धा व्यक्त केली नाही.
 
 
udhayanidhi stalin, priyank kharge
 
 
udhayanidhi stalin, priyank kharge आपली राजकीय पोळी शेकून घेण्यासाठी परिवार आणि पक्ष वाचविण्यासाठी या सत्तापिपासू हिंदुत्वाचा खोटा आव आणणारे, पोलिस संरक्षणात साधू-संतांची हत्या झाल्यानंतरही गप्प बसणारे, हनुमान चालीसा पठन करणाèयांना तुरुंगात टाकणारे, हे ढोंगी व पाखंडी यावेळी पुन्हा एकदा उघडे पडले आहेत. udhayanidhi stalin, priyank kharge नाही त्या विषयात लगेच फेसबुक लाईव्ह करून अक्कल पाजळणाऱ्यांची, उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर येथे मंदिरात झोपलेल्या दोन साधूंची हत्या झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांना फोन करून चिंता व्यक्त केली. udhayanidhi stalin, priyank kharge इतकी काळजी साधू-संतांची होती तर उत्तरप्रदेशातील घटनेपूर्वी हृदयद्रावक घटना तुमच्या राज्यात घडली, तेव्हा काय केलं? भाजपासारखे आमचे ढोंगी हिंदुत्व नाही म्हणून सांगणाऱ्या या जमातीची आता हिंदू धर्माबद्दल इतक्या खालच्या आणि निंदनीय असे शब्द काढणाऱ्या स्टॅलिनला फोन करून खडसावण्याची हिंमत झाली नाही. फोन तर दूर राहिला; साधं ट्विटदेखील केलं नाही. udhayanidhi stalin, priyank kharge
 
 
जगातला कोणताच धर्म निर्दोष नाही, भाजपाचे जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मात आहे. सनातन धर्म गाईला देवता, माता मानतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना शेंडी-जाणव्याचं, घंटा बडवणाऱ्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं, भाजपा निवडणुकीत राम, हनुमान आणतात, राजेशाहीचं प्रतीक ‘सेंगोल' लोकसभेत आणतात, यालाच रूढीवाद आणि हुकूमशाही म्हणतात... असे वेगवेगळे दाखले देऊन, स्टॅलिनच्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थन करताना या पाखंडी लोकांची लाचारी प्रकर्षाने दिसून येते. udhayanidhi stalin, priyank kharge आपल्या सोयीचे दाखले देताना, स्वातंत्र्यवीर सावरकर बरे आठवले यांना... जेव्हा काँग्रेसवाले सावरकरांचा अपमान करतात, तेव्हा हे शेपूट घालून बसतात. आज बाळासाहेब ठाकरेंची ‘हिंदुहृदयसम्राट' म्हणून बरी आठवण झाली. नाही तर, मुख्यमंत्रिपदावर असताना बॅनर, पोस्टरवरून ‘हिंदुहृदयसम्राट' हा शब्द गायब करणारे ते हेच होते ना... udhayanidhi stalin, priyank kharge भाषणातून बाळासाहेबांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट'चा उल्लेख टाळणारे हेच ते होते ना... सत्तेच्या अडीच वर्षांत ‘हिंदुहृदयसम्राट' ऐवजी ‘जनाब' बनलेले बाळासाहेब आता बरे आठवले यांना... बरं भाजपाचं ढोंगी हिंदुत्व आणि शेंडी-जानव्याचं, घंटा बडवणाऱ्यांचं हिंदुत्व मान्य नाही. तर, कोणतं हिंदुत्व मान्य आहे म्हणायचं? अजान स्पर्धा भरवणारं...?
 
 
udhayanidhi stalin, priyank kharge नव्या संसद भवनात स्थापित केलेला ‘सेंगोलङ्क राजेशाहीचं, रूढीवाद आणि हुकूमशाही प्रतीक नसून प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड पंडित नेहरूंकडे सोपविला होता. पंडित नेहरू यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १०.४५ वाजता हा राजदंड ब्रिटिशांकडून स्वीकारला होता. स्वातंत्र्य मिळाल्याचं ऐतिहासिक महत्त्व असलेला हा राजदंड ‘सेंगोल' आहे. ज्या तामिळनाडूच्या स्टॅलिनने सनातन धर्माचा अवमान केलाय् ना... त्यांच्याच राज्यातून आणलेला हा ऐतिहासिक राजदंड आहे. udhayanidhi stalin, priyank kharge केवळ ‘सेंगोल' स्थापित केल्याचा अर्थ रूढीवाद आणि हुकूमशाही असा होत असेल तर मग विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा येथे पीठासीन अधिकाèयांसोबत राजदंड आणण्याची आणि त्यांच्या समोरील टेबलवर ठेवण्याची प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहे. udhayanidhi stalin, priyank kharge उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधानसभा आणि विधान परिषदेतील रूढीवाद आणि हुकूमशाहीचे प्रतीक असलेले ते राजदंड हटविण्याचा निर्णय का नाही घेतला...? पण मालक आणि नोकर हे दोघेही जन्मजात बालबुद्धीचे धनी आहेत. त्यामुळे विधायक टीका किंवा विधायक विरोध करण्याची यांची कुवत नाही आणि यांच्याकडून प्रगल्भ राजकारणाची, प्रगल्भ विरोधक म्हणून भूमिका निभावण्याची अपेक्षा करणेच मूर्खपणाचे आहे.
 
 
udhayanidhi stalin, priyank kharge बरं; त्या स्टॅलिन नावाच्या नटाने सनातन धर्माच्या विरोधात बोललेले डॉयलॉग हे स्वतःचे होते की कोणी लिहून दिले होते. ठरवून केलेला हा प्रकार आहे की उत्स्फूर्तपणे गरळ ओकली, हे मुद्दे तर अजून वेगळेच आहेत. पण जी काही गरळ ओकली त्यावर काँग्रेस, ममता बॅनर्जी सारख्यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. udhayanidhi stalin, priyank kharge पण आम्ही हिंदुत्व सोडलं असलं, तरी हिंदुत्व सोडलं नसल्याचा छातीठोक दावा करताना, भाजपाला हिंदुत्व शिकवू आणि गरळ ओकणाऱ्यांना पाठीशी घालू. ही ढोंगी, पाखंडी वृत्ती आता सामान्य जनतेला कळून चुकली आहे.
९२७०३३३८८६