तलाठी दारूच्या नशेत असल्याची व्हिडीओ व्हायरल

08 Sep 2023 18:40:48
कुरखेडा,
Talathi being drunk गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांनाही छुप्या मार्गाने दारूची तस्करी करत विक्री केल्या जाते. अशातच कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी साजा क्रमांक 8 मधील तलाठी किशोर राऊत दारुच्या नशेत कार्यालयात जाऊन सही मारतांनाच खुर्चीवरुन खाली पडल्याची घटना 6 सप्टेंबर रोजी घडली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 

Talathi being drunk 
 
जिल्ह्यात दारुबंदी आहे. पोलिस अधीक्षक निलोत्पल आल्यापासून जिल्ह्यातील अवैध दारूवर धाडसत्र राबविण्यात येत आहे. मात्र तरीही छुप्या मार्गाने दारुची विक्री केल्या जाते. कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी तलाठी कार्यालय साजा क्रमांक 8 येथील तलाठी किशोर राऊत हे गेल्या आठ- दहा दिवसांपासून दारुच्या नशेत तलाठी कार्यालयात हजर राहत, शेतकर्‍यांना वेळेवर लागणारे दाखले व शेतीविषयक कामे होत नसल्याने शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बोंब होती. याबाबत संबंधित मंडळ अधिकारी यांना माहिती देण्यात आली होती. Talathi being drunk दरम्यान 6 सप्टेंबर रोजी काही शेतकरी शेतीविषयक कामांसाठी तलाठी कार्यलयात गेले असता तलाठी राऊत हे एवढे दारुच्या नशेत होते की त्यांना सही करणेही अवघड जात होते. यावेळी सही करता करता ते खुर्चीवरुन जमिनीवर खाली पडले. सदर प्रकाराने महसूल विभागाला मान खाली टाकावी लागत आहे. आता सदर तलाठ्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0