मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील लाखापूर गावातील रस्ते, तसेच लाखापूरवरून देवी फाट्याकडे जाणारा रस्ता आणि रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे, यामुळे या रस्त्यांवरून पायी चालणेदेखील शक्य होत नव्हते. अखेर गावातील तरुणांनी बुधवार, 6 सप्टेंबरला पूर्ण दिवस आपल्या शेतातील काम बंद ठेवून रस्त्यावर उतरून Villagers Shramdan श्रमदानातून हे रस्ते चालण्यायोग्य बनविले. संबंधित विभाग व गट ग्रामपंचायतकडून या रस्त्यांची कामे दुर्लक्षित असून, ही कामे करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. लाखापूरवरून बाहेर जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे रस्त्यावर डोलत होती.
Villagers Shramdan पावसाळ्यात गावातील पाणी रस्त्यावरून वाहून न जाता रस्त्यावर साचत होते. यामुळे या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, गावातील रस्त्यांची दैना झाली आहे. या रस्त्यावर सर्व दगडगोटेवर आले असून, रस्त्यावरून नागरिकांना भांदेवाडा तीर्थक्षेत्र व पायीदेखील चालणे फारच कठीण झाले आहे. यामुळे या मार्गांवर अपघात होण्याची शक्यता बळावली जात होती. किंबहुना किरकोळ अपघात झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
Villagers Shramdan या संदर्भात येथील स्थानिक ज्येष्ठ नागरिक तथा युवकांनी झोपलेल्या स्थानिक प्रशासन तसेच संबंधित विभागाला जागे करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून गावातील रस्ते व लाखापूर ते वनोजादेवी मार्ग झुडूपाने वेढले होते त्याला येथील तरुणांनी बुधवारला सकाळी आठपासून दुपारपर्यंत येथील रस्त्यावर मुरूम, माती व फवारणीचे काम श्रमदानातून पूर्ण केले. दरम्यान, पावसाच्या रिपरिपमुळे पूर्ण दिवसभर काम होऊ शकले नाही. या रस्त्यावरील कचर्यावर फवारणी, दगडगोटे, खड्डे त्यावर माती, मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत, चालण्याजोगा करण्यात आला. यात गावातील असं‘य तरुणांचा सहभाग होता.