बडकस चौक शाखा वस्तीत अक्षत कलशाचे भव्य स्वागत

    दिनांक :01-Jan-2024
Total Views |
 नागपूर,
Akshat प्रभू श्री रामचंद्राच्या भव्य मंदिराचे औचित्य साधून चौक शाखा वस्ती येथे  अक्षत कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.  दिंडी, टाळ मृदंगच्या गजरात ,चितार ओळीतील हनुमान मंदिरातून मिरवणूक निघून पाताळेश्वर मंदिरात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला व तेथेच अक्षत कलश भाविकांच्या दर्शनासाठी दोन दिवस ठेवण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री गोविंद शेंडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इतवारी भाग संघचालक संजय शिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
  
sn
 
यावेळी गोविंद शेंडे यांनी, अयोध्येतील राम मंदिर हे नुसते मंदिर नसून संपूर्ण हिंदू समाजाला एकत्रित करून संघर्षाची प्रेरणा देणार राष्ट्र मंदिर आहे.Akshat राम जन्मभूमी आंदोलनासाठी साडेपाचशे वर्षाहून अधिक काळ केलेला संघर्ष आणि त्यानंतर मिळालेले फळ मंदिर निर्माण मंदिर प्राणप्रतिष्ठा 'याची देही याची डोळा' बघण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. अशा शब्दातआपल्या भावना व्यक्त  केल्या होत्या.याप्रसंगी आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक श्रीपाद रिसालदार यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक सहभागी होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन देव, अरुणर ठेमदेव, आबा खांडवे, अमोल व अशोक हरिदास, सचिन नाईक, राजा लक्षणे यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: पुष्कर लाभे,संपर्क मित्र