ठाणे :
MPSC President महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, MPSC President नवी मुंबई येथे सोमवारी स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली.
MPSC President आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. पांढरपट्टे यांनी सेठ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आयोगाच्या सचिव डॉ. खरात यांनी सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्यपद्धती विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ही माहिती समजून घेतल्यानंतर सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शिस्तबद्धतेने व पारदर्शकपणे काम करावे लागेल, असे आवाहन आयोगाच्या सदस्यांना व अन्य अधिकाऱ्यांना केले.