23 जानेवारीपर्यंत आखिव पत्रिका द्या, अन्यथा आमरण उपोषण

पिंकु बावणेचे भुमिअभिलेख अधिकार्‍यांना अल्टिमेटम

    दिनांक :10-Jan-2024
Total Views |
देसाईगंज,
Pinku Bawane Uposhan : अतिदुर्गम, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याची सर्वात जुनी नगर परिषद असलेल्या देसाईगंज शहरात वास्तव्यास असलेल्या नागरीकांना मागील अनेक वर्षांपासून आश्‍वासनांच्या खैरातीत पिसल्या जात आहे. शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करण्यासाठी नगर परिषदेने देय रक्कम अदा करूनही अद्याप रहिवाशांना आखीव पत्रिका देण्यात न आल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या 23 जानेवारीपर्यंत आखीव पत्रिका देण्यात यावी, अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा अल्टिमेटम देसाईगंज शहर काँग्रेस कमिटीचे Pinku Bawane Uposhan माजी अध्यक्ष पिंकु बावणे यांनी भुमिअभिलेख अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
 
Pinku Bawane Uposhan
 
निवेदनात बावणे Pinku Bawane Uposhan यांनी म्हटले आहे की, देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील रहिवाशांना अद्यापही आखिव पत्रिका देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासकीय स्तरावरुन देण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना तसेच शबरी घरकुल योजनेचा लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करण्यासाठी देसाईगंज नगर परिषदेने भुमिअभिलेख कार्यालयाकडे आवश्यक रक्कम अदा केलेली आहे. Pinku Bawane Uposhan त्यामुळे भुमिअभिलेख कार्यालयाने देसाईगंज नगर भूमापनाचे काम पुर्ण करून सिमा निश्‍चित करून नगर परिषदेला आखीव पत्रिका उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र असे न करण्यात आल्याने शहरातील अनेक गोरगरीबांना झोपडीवजा तंबुत राहावे लागत आहे. ही गंभीर बाब असुन शासन निर्णयाला हरताळ फासण्यासारखे आहे.
 
 
केंद्र व राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी पक्के मकान उपलब्ध व्हावे म्हणून विविध योजना जाहीर केल्या आहेत. मात्र प्रशासनाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांना उघड्यावर संसार थाटावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. त्यामुळे 23 जानेवारीच्या आत आखिव पत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी Pinku Bawane Uposhan मागणी निवेदनातून केली आहे.
 
 
निवेदन देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांना देखील देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, सेवादल अध्यक्ष भिमराव नगराळे, युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ता पंकज चहांदे, महिला जिल्हा उपाध्यक्ष आरती लहरी, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे, राजू राऊत, महिला तालुका उपाध्यक्ष रजनी आत्राम, महिला ओबीसी सेल तालुकाध्यक्ष यामिनी कोसरे, सेवादल तालुकाध्यक्ष दुशांत वाटगुरे आदींची उपस्थिती होती.