खासदार क्रीडा महोत्सव पर्व सहाचे १२ जानेवारीला उद्घाटन

    दिनांक :10-Jan-2024
Total Views |
- केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार
 
नागपूर, 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या Khasdar Krida Mahotsav खासदार क्रीडा महोत्सव सहाव्या पर्वाचे उद्घाटन शुक्रवार, १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता धंतोलीतील यशवंत स्टेडियमवर होणार असल्याची माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
kkm
 
याप्रसंगी बोलताना संदीप जोशी म्हणाले, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. चंद्रशेखर बावनकुळे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यंदा खासदार क्रीडा महोत्सवामध्ये ५५ खेळांचा समावेश करण्यात आला असून, ६५ मैदानांवर स्पर्धा रंगणार आहेत. सायकqलग, खो-खो, अ‍ॅथ्लेटिक्स, कबड्डी, बॅडqमटन आणि ज्युडो हे सहा खेळ विदर्भ स्तरावर आयोजित करण्यात आले आहेत. क्रीडा महोत्सवात एकूण १.३५ कोटी रुपयांची पारितोषिके वितरीत करण्यात येतील.
 
 
Khasdar Krida Mahotsav महोत्सवाची सुरुवात १२ जानेवारीला मॅराथॉन आणि युवा दौडीने होणार आहे, तर समारोप २८ जानेवारी रोजी होणार आहे. या महोत्सवात यंदा सुमारे ६५ हजार खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. यंदा लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि फ्लोअरबॉल या खेळांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाèया सर्व खेळाडूंना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विमा प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही स्पर्धांमधील सर्व खेळाडूंना संबंधित खेळांच्या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत खासदार क्रीडा महोत्सव समितीचे आशिष मुकीम, अश्पाक शेख उपस्थित होते.