अबुधाबीतील हिंदू मंदिराचे १४ फेब्रुवारीला लोकार्पण

    दिनांक :11-Jan-2024
Total Views |
गांधीनगर, 
Abu Dhabi Hindu temple पुढील महिन्यात अबू धाबीमधील बीपीएस हिंदू मंदिराचे Abu Dhabi Hindu temple लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संयुक्त अरब अमिरातचे भारतातील राजदूत अब्दुलनासेर अलशाली यांनी गुरुवारी येथे दिली.
 
 
Abu Dhabi Hindu temple
 
आम्ही १४ फेब्रुवारी रोजी लोकार्पणाची प्रतीक्षा करीत आहोत. हा एक अभूतपूर्व दिवस असणार आहे, दोन्ही देशांमधील नाते अधिक दृढ करण्यासाठी हा महत्त्वाचा दिवस असेल, असे राजदूत अलशाली यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. Abu Dhabi Hindu temple गत महिन्यात स्वामी ईश्वरचरणदास व स्वामी ब्रह्मविहारीदास यांनी बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीपीएस) हिंदू मंदिराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले होते व ते त्यांनी स्वीकारले आहे.
 
१३ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथील शेख झायेद स्पोट्र्स सिटी स्टेडियमवर आयोजित भव्य मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले असल्याची पुष्टी अलशाली यांनी केली आहे. या मेळाव्याला ‘अहलान मोदी' अर्थात् ‘हॅलो मोदी' असे नाव देण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये ३.५ दशलक्ष भारतीय लोकसंख्या आहे. Abu Dhabi Hindu temple मंगळवारी भारत व संयुक्त अरब अमिरातने चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून द्विपक्षीय सहकार्य मजबूत केले. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी आणि संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यातील चर्चेत या करारांना अंतिम रूप देण्यात आले. Abu Dhabi Hindu temple यापैकी तीन सामंजस्य करार हे दुबईचे गुंतवणूक मंत्रालय आणि भारत सरकार यांच्यात आहेत आणि चौथा सामंजस्य करार डीपी वल्र्ड व गुजरात सरकार यांच्यात राज्यातील शाश्वत बंदरे विकसित करण्यासाठी आहेत.