तभा वृत्तसेवा
अमरावती,
Sant Achyut Maharaj : विदर्भाचे ज्ञानेश्वर म्हणून ओळखले जाणारे प. पु. वंदनिय गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव त्यांचे जन्मगाव वरुड येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी 20 ते 28 जानेवारी दरम्यान साजरा होणार आहे. पुढे वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतील, अशी माहिती Sant Achyut Maharaj श्री संत अच्युत महाराज जन्मशताब्दी उत्सव समिती, वरुडचे अध्यक्ष सुधीर दिवे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
वरूड येथील श्री संत अच्युत महाराज Sant Achyut Maharaj सभागृहात सर्व कार्यक्रम होणार आहेत. 20 जानेवारीला दुपारी जन्मशताब्दी महोत्सवाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होईल. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, खा. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, आ. बच्चू कडू, आ. प्रताप अडसड, आ. देवेंद्र भुयार, आ. सुलभा खोडके, आ. यशोमती ठाकूर, आ. रवि राणा, आ. बळवंत वानखडे, आ. दादाराव केचे, आ. राजकुमार पटेल, आ. प्रवीण पोटे, मुलताईचे आ. चंद्रशेखर देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आ. गिरीश गांधी, माजी आ. नरेशचंद्र ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
उत्सवाची सुरूवात व्यास पुजन व कलश स्थापनेसह ‘100 कोटी ॐ अच्युताय नमः’ नामजप व शंभर कुंडी गायत्री व विष्णूयाग यज्ञाने होईल. हा यज्ञ 21 ते 27 जानेवारीपर्यंत दररोज होईल. त्याशिवाय दररोज श्रीमद भागवत कथा प्रवचन सचिन देव महाराज व केशवराव भोंडे महाराज यांचे ग्रामगीता पारायण होईल. Sant Achyut Maharaj रविवारी 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पंडित अजित कडकडे यांची भजन संध्या होईल. 22 जानेवारीला श्री संत अच्युत महाराज साहित्य संमेलन होईल. या संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. अरविंद देशमुख करतील. संमेलनात रायजीप्रभू शेलोटकर, पौर्णिमा सवाई, मुळे शास्त्री महाराज, रंजना फरकाडे, डॉ. माया आंडे, पुष्पा वरखेडकर भाष्य करतील. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. साजिद शाह राहतील. ते श्री संत अच्युत महाराज यांनी लिहलेल्या 100 पेक्षा जास्त ग्रंथावर विवेचन करणार आहेत.
श्री संत अच्युत महाराज Sant Achyut Maharaj जन्मदिनी 27 जानेवारीला संत मेळावा आयोजिण्यात आला आहे. प. पु. श्री जितेंद्रनाथ महाराज आणि जगतगुरु रामराजेश्वर माऊली सरकार व अनेक थोर संत मंडळी उपस्थितीत राहतील. दुपारी 4.30 वाजता संत अच्युत महाराजांचे चरित्र किर्तन होईल. सायंकाळी 5.35 वाजता महाराजांचा जन्मोत्सव होईल. त्यानंतर लगेच 100 माता व शिशुंचा सत्कार करण्यात येईल. 28 जानेवारीला सकाळी संत अच्युत महाराजांची भव्य शोभायात्रा निघेल. त्यानंतर काल्याचे कीर्तन होईल. लगेच समारोपीय कार्यक्रमाला प्रमखु पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचीपण उपस्थिती राहील. हभप सचिन देव महाराज यांचे समारोपीय प्रवचन होईल. शताब्दी उत्सवाच्या सर्व कार्यक्रमांना भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री संत अच्युत महाराज जन्मशताब्दी उत्सव समितीच्या सदस्यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला सचिन देव महाराज, डॉ. अनिल सावरकर, मनोज वाडेकर, सागर पासेबंद, शुभदा पोतदार, सुधीर जोशी, दत्ता शिंदे, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. डहाणे, गिरीधर देशमुख उपस्थित होते.